चिमणपुरी शिवारात वडाचे झाड कोसळले; गाय जखमी, मोटरसायकलचे नुकसान
1 min read

चिमणपुरी शिवारात वडाचे झाड कोसळले; गाय जखमी, मोटरसायकलचे नुकसान

Loading

चिमणपुरी शिवारात वडाचे झाड कोसळले; गाय जखमी, मोटरसायकलचे नुकसान

अमळनेर : तालुक्यातील चिमणपुरी शिवारात बुधवारी दुपारी अचानक भलेमोठे वडाचे झाड कोसळल्याने एक गाय व मोटरसायकल झाडाखाली दबली गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना पुरुषोत्तम चौधरी यांच्या शेतात घडली. कापूस लागवडीचे काम सुरू करण्याच्या तयारीत असताना अचानक झाड कोसळले. काही क्षणांपूर्वीच शेतकरी व मजूर त्या ठिकाणाहून दूर गेल्याने मोठा अनर्थ टळला.

स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत करून झाडाखाली अडकलेल्या गायीला बाहेर काढले. गायीला किरकोळ दुखापत झाली असून मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक व जुन्या झाडांची पाहणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *