वारकरी परंपरेतील योगदानाची दखल; पांडुरंग माळी यांचा धुळ्यात सन्मान
![]()
कान्हादेश वारकरी सेवा मंडळातर्फे भडणे येथील पांडुरंग माळी जेष्ठ वारकरी पुरस्काराने सन्मानित ,,,,,,,
शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माजी सरपंच व वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पूना माळी यांना कानदेश वारकरी मंडळातर्फे यावर्षी धुळे येथे ज्येष्ठ वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे शहराचे आमदार अनुप भाऊ अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार र महापौर मायादेवी परदेशी उपमहापौर प्रफुल पाटील मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
धुळे येथील श्री प्रसन्न हनुमान मंदिराच्या प्रांगणात कान्हा देश वारकरी सेवा मंडळातर्फे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक मध्य प्रदेश तसेच गुजरात राज्यातील ज्येष्ठ वारकरी युवा वारकरी जेष्ठ वारकरी यांना मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ह भ प ज्ञानेश्वर महाराज बेलदारवाडीकर ह भ प सतीश महाराज भोगे ह भ प पवण गिरीजी महाराज ह भ प भाऊ रुद्र महाराज ज्येष्ठ वारकरी ह भ प हिरामण गवळी ह भ प गोपाल महाराज चिमठाणे कर वारकऱ्यांच्या उपस्थित ज्येष्ठ वारकरी हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर भोकरे सुनील वाघ कैलास पवार नगरसेवक थोरात विभांडित नाना भैया दादा अमळथेकर भैय्यासाहेब पवार किरण भारती विश्वस्त पप्पू शिंदे शिंदखेडा तालुका अध्यक्ष ह भ प सुदर्शन महाराज यावेळी उपस्थित होते

