अमळनेर शहर ओबीसी आघाडीच्या पदावर दिपक पाटील यांची नियुक्ती
1 min read

अमळनेर शहर ओबीसी आघाडीच्या पदावर दिपक पाटील यांची नियुक्ती

Loading

अमळनेर शहर ओबीसी आघाडीच्या पदावर दिपक पाटील यांची नियुक्ती

अमळनेर प्रतिनिधी :
शिवसेना पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अमळनेर शहर ओबीसी आघाडीच्या पदावर दिपक श्रीराम पाटील (रा. अमळनेर, जि. जळगाव) यांची पुढील एक वर्षांच्या कालावधीसाठी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शिवसेना व ओबीसी आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही नियुक्ती वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करत तसेच शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. यासोबतच जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख आ. दिलीप मामा लांडे यांच्या सूचनेनुसार आणि माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच ओबीसी आघाडी जिल्हाप्रमुख रुपेश माळी यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर विधानसभा क्षेत्रातील पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी दिपक पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य दिपक पाटील सक्रियपणे करतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. गुलाब काशिनाथ पाटील यांनी दिपक पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमळनेर तालुक्यातील शिवसैनिक व ओबीसी आघाडीच्या कार्यकर्त्यांकडूनही त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *