देशाला सुसंस्कृत अधिकाऱ्यांची आवश्यकता – जनार्दन महाराज.  ५० विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षाचे विनामूल्य निवासी प्रशिक्षण. सतपंथ शिष्यवृत्ती महाभियान प्रकल्पाचे उद्घाटन.
1 min read

देशाला सुसंस्कृत अधिकाऱ्यांची आवश्यकता – जनार्दन महाराज. ५० विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षाचे विनामूल्य निवासी प्रशिक्षण. सतपंथ शिष्यवृत्ती महाभियान प्रकल्पाचे उद्घाटन.

Loading

देशाला सुसंस्कृत अधिकाऱ्यांची आवश्यकता – जनार्दन महाराज.

५० विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षाचे विनामूल्य निवासी प्रशिक्षण.
सतपंथ शिष्यवृत्ती महाभियान प्रकल्पाचे उद्घाटन.

जळगाव – देशाला सुसंस्कृत आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे . तरुणांनी प्रशासकीय सेवेत येऊन
आपल्या सेवेतून देशाची प्रगती साधावी असे प्रतिपादन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले .जळगाव येथे आयोजित सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या 50 विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रकल्पाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे , रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे,श्यामचैतन्य महाराज ,उपमहापौर मनोज चौधरी, नोबेल फाउंडेशनचे एस जे पाटील, नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील मंचावर उपस्थित होते.
जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 50 युवक युवतींसाठी नोबेल फाउंडेशन आणि शतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे निवासी विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत यात या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच जेईई,नीट परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. प्रकल्पाच्या इमारतींचे उद्घाटन थाटात संपन्न झाले.
पुढे बोलताना जनार्दन महाराज म्हणाले की विद्यार्थ्यांनी मला बाबा म्हणावे जेणेकरून समाजामध्ये संदेश जाईल की प्रत्येक बाबा भोंदू नसतो यावेळी महाराज यांनी अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केले जर आपला समाज बाहेरून आलेल्या व्यक्तींना करोडो रुपये गोळा करून देत असेल तर मी जर गरिबांच्या शिक्षणासाठी काम करत असेल तर समाज माझ्या पाठीशी का उभा राहणार नाही हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महादेवाच्या पिंडीला मधाचे पान लावून विद्यार्थी आयएएस आयपीएस होऊ शकत नाहीत यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता असते असेही ते म्हणाले. नोबेल फाउंडेशन आणि सतपंच ट्रस्टच्या माध्यमातून या गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात यशाचा प्रकाश पेरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन त्यांनी उपस्थित त्यांना दिले याप्रसंगी बोलताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की “ चीन क्लासेस क्षेत्रात लाखोंची फी घेणाऱ्या संस्था आहेत यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या कोचिंग क्लासेस ला जाऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जयदीप पाटील आणि नोबेल फाउंडेशन यांनी उचललेले पाऊल हे कौतुकास्पद आहे टेबल ट्रस्टचे कार्य हे संपूर्ण जिल्हाभर व्हावे तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे केंद्र उभे राहावेत यासाठी मी स्वतःही प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे यांनी सतपंच चॅरिटेबल ट्रस्ट आणि नोबेल फाउंडेशनच्या प्रकल्पाचे कौतुक केले नोबेल फाउंडेशन चे कार्य शहरासाठी आदर्श आहे असेही ते म्हणाले. प्रकल्पाच्या स्थानिक पालक होण्याचा मला आनंद आहे असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार अमोल जावळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट देण्यात आले तसेच यावेळी प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जयदीप पाटील यांनी या प्रकल्पा मागील भूमिका मांडताना सांगितले की ,मी स्वतः ग्रामीण भागातून गरिबीतून शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचलो.आपण पुढे गेल्यानंतर आपल्या मागे असलेल्यांना हात देणे हीच आपली संस्कृती आणि आई-वडिलांचे संस्कार आहेत.जनार्दन महाराज यांच्या आशीर्वादाने समाजातील गरीब व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी नोबेल फाउंडेशन काम करेल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन राजेंद्र सिंग राजपूत यांनी केले तर आभार शैलेंद्र महाजन यांनी मांडले यावेळी नंदू अडवाणी , जैन उद्योग समूहाचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी ,रायसोनी विद्यालयाचे डीन संजय शेखावत,मुंबई येथील उद्योजक प्रवीण भाई पटेल नाशिक येथील उद्योजक कांतीभाई पटेल सरपंच चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संजय महाजन , नोबेल फाउंडेशन चे संचालक रमेश राजाराम पाटील राज्यकर अधिकारी राहुल पाटील, जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे सचिव डी एस पाटील , रामचंद्र पाटील,उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश पाटील राजेंद्र पाटील ,प्रशांत पाटील ,प्रेम मराठे आदी मान्यवरांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *