राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाही पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड , गुप्त मतदानातून CR व LR पदासाठी निवड; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
1 min read

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाही पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड , गुप्त मतदानातून CR व LR पदासाठी निवड; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाही पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड

गुप्त मतदानातून CR व LR पदासाठी निवड; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पारोळा प्रतिनिधी : पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वर्ग प्रतिनिधी (CR) व विद्यार्थिनी प्रतिनिधी (LR) पदाची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रक्रियेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच वर्गातील विविध समस्या व शैक्षणिक गरजा प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व तयार व्हावे, या उद्देशाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
अकरावी व बारावी कला आणि विज्ञान शाखेतील वर्गांतून १८ विद्यार्थ्यांनी वर्ग प्रतिनिधी पदासाठी, तर चार विद्यार्थिनींनी विद्यार्थिनी प्रतिनिधी पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी १२ ते १ या वेळेत झालेल्या प्रचारादरम्यान उमेदवारांनी अभ्यासक्रम, ग्रंथालय सुविधा, स्वच्छता, क्रीडा तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडत मतदारांशी संवाद साधला.
महाविद्यालयाच्या निवडणूक निर्णय समितीच्या देखरेखीखाली दुपारी १ ते ३ या वेळेत गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यानंतर दुपारी ३ वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व वर्गांचे निकाल जाहीर करण्यात आले.

विजयी प्रतिनिधी

– अकरावी कला : मानसी संदीप सूर्यवंशी
– बारावी कला : वैभवी विजय भोई
– अकरावी विज्ञान ‘अ’ : शुभम गोरख महाजन
– अकरावी विज्ञान ‘ब’ : कमलेश लक्ष्मण पाटील
– बारावी विज्ञान ‘अ’ : वैष्णवी भीमराज माळी
– बारावी विज्ञान ‘ब’ : यश राहुल बोरसे
– विद्यार्थिनी प्रतिनिधी (LR) : वैष्णवी सुकलाल पाटील, बारावी विज्ञान

ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक समिती प्रमुख प्रा. ए. ए. मोरे तसेच सदस्य प्रा. बी. डब्ल्यू. पाटील, प्रा. एल. आर. देसले व प्रा. श्रीमती वाय. आर. पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. श्रीमती व्ही. एस. पाटील व उपप्राचार्य प्रा. पी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
नवनिर्वाचित वर्ग प्रतिनिधींचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना भावी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *