लोकसहभागातून हिवताप व डेंग्यू जनजागृती; आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जाहीर सत्कार ,मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
1 min read

लोकसहभागातून हिवताप व डेंग्यू जनजागृती; आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जाहीर सत्कार ,मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Loading

लोकसहभागातून हिवताप व डेंग्यू जनजागृती; आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जाहीर सत्कार

मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

मारवड प्रतिनिधी :
प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथील आरोग्य सेवक योगेश रजनी वाल्मीक कापडणे यांनी जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त लोकसहभागातून प्रभावी जनजागृती अभियान राबवून समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण केली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

हा सत्कार गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी तसेच तालुका पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी योगेश कापडणे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत आरोग्य विभागासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय डेंग्यू दिवस यशस्वीरीत्या साजरा करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी, आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे, आरोग्य सहाय्यक किशोर माळी, संजीव पाटीलतुषार पाटील यांनी मार्गदर्शन केले.

मारवड ग्रामपंचायत स्तरावर सरपंच भिकन पाटील, ग्रामसेवक नितीन पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनीही उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल चौधरी, विद्या देवरे, आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के. आर. साबळे, आरोग्य सहायिका सुनिता गावित, औषध निर्माण अधिकारी विलास बि-हाडे, आरोग्य सेविका ललिता तिडके, सरला परदेशी, हिरामण मेठे तसेच आशा सेविका संगीता चौधरी, राजश्री पाटील, मनीषा पाटील, मंदाताई शिंदे, कल्याणी पाटील आदींचे सहकार्य लाभले.

आरोग्य विभागाच्या या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये हिवताप व डेंग्यूसंदर्भात सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *