धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन – उपस्थित राहा, इतिहासाचा भाग व्हा!:– प्रा. ए के गंभीर*
![]()
*धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन – उपस्थित राहा, इतिहासाचा भाग व्हा!:– प्रा. ए के गंभीर*
धानोरा, जळगांव – महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील माळी समाजाचे प्रमुख नेते आणि समाजसुधारक रविवारी धानोरा येथे ऐतिहासिक अधिवेशनासाठी एकत्र येत आहेत. क्षत्रिय माळी समाजसुधारक मंडळ, महाराष्ट्र आणि गुजरात माळी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २४ मे २०२६, सकाळी ९.३० वा., मिशन शाळा, सेंट्रल बँके समोर, धानोरा, ता. चोपडा, जि. जळगांव येथे होणार आहे.
या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यांच्या माळी समाज मंडळाचे अध्यक्ष, श्री ए. के. गंभीर, समाजाच्या विकास, सामाजिक सुधारणा आणि भविष्यातील धोरणांवर प्रबळ चर्चेस उपस्थित राहणार आहेत.
सभेचे अध्यक्ष, मा. श्री आत्माराम कौतीक गंभीर, यांनी सर्व माळी समाजास उपस्थित राहून समाजाच्या भविष्याचा निर्णय घेण्याचे प्रबळ आवाहन केले आहे. हे अधिवेशन केवळ सभेसाठी नाही, तर सर्व माळी समाजाच्या सदस्यांसाठी ऐतिहासिक संधी आहे. प्रत्येकाची उपस्थिती ही समाजाच्या उन्नतीसाठी एक पाऊल ठरेल.
माळी समाजाचे सर्व सदस्य, नेते आणि युवक कार्यकर्ते, महिला भगिनी यांनी सभेत हजेरी लावून समाजाच्या विकासाच्या या ऐतिहासिक प्रवासाचा भाग होण्याचे आव्हान करण्यात येते.
याद्वारे सर्व सदस्यांनी उपस्थित राहून आपल्या समाजाच्या शक्तीची साक्ष दाखवावी, असे आव्हान मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. ए के गंभीर सर यांच्या कडून करण्यात येत आहे

