वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या – अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष*
1 min read

वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या – अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष*

Loading

*वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या – अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष*

*नीट (NEET)* वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या प्रचंड गैरव्यवहारामुळे आज देशातील तब्बल बावीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. ही केवळ एका परीक्षेची गोपनीयता धोक्यात येण्याची बाब नसून, देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लागलेली शिक्षण माफियांची कीड यातून उघड झाली आहे. या घोटाळ्यामुळे नैराश्यातून चार निष्पाप विद्यार्थ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागली आहे, परंतु हा आत्महत्येचा प्रकार नसून भ्रष्ट यंत्रणेने घेतलेला तो बळी आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, देशातील या सर्वात मोठ्या परीक्षेचे पवित्र्य राखण्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. घोटाळा समोर आल्यानंतर सुरुवातीला तो पूर्णपणे नाकारणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी नेहमीप्रमाणे आपली नैतिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देणे गरजेचे होते, परंतु त्यांनी तसे न केल्यामुळे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच धारिष्ट्य दाखवून शिक्षण मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी आता राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *