मोबाईलच्या युगात संस्कारांची नवी दिशा; बाल शिबिराला पालकांचा भरघोस प्रतिसाद
1 min read

मोबाईलच्या युगात संस्कारांची नवी दिशा; बाल शिबिराला पालकांचा भरघोस प्रतिसाद

Loading

मोबाईलच्या युगात संस्कारांची नवी दिशा; बाल शिबिराला पालकांचा भरघोस प्रतिसाद

 

 

अमळनेर :
गीता परिवाराच्या प्रेरणेने तसेच सौ. उर्मिला जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेले बाल संस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दिनांक ११ मे २०२६ ते १५ मे २०२६ दरम्यान पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन लिनेस क्लब ऑफ अमळनेर व गीता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

आजच्या संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या युगामुळे जग जरी जवळ आले असले, तरी मुलांमध्ये संस्कारांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. विभक्त कुटुंब पद्धती, तसेच दोन्ही पालक करिअरच्या धावपळीत व्यस्त असल्याने मुलांच्या जडणघडणीसाठी आणि नैतिक संस्कारांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत मुलांमध्ये नैतिक मूल्ये, देशभक्ती, शिस्त, आत्मविश्वास आणि चांगले संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अशा प्रकारची शिबिरे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. शिबिरामध्ये विविध संस्कारमूल्यांवर आधारित उपक्रम, मार्गदर्शन, प्रार्थना, कथा, खेळ आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे कार्यक्रम घेण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिनेस क्लबच्या डॉ. नैना नवसारीकर, कविता पारख, जास्मिन भरूचा यांच्यासह प्रा. जगदीश अग्रवाल, वनश्री अमृतकर, सुनीता करंजे, गंगा अग्रवाल, अर्चना शर्मा, ॲड. भारती अग्रवाल व पद्मजा पाटील आदींनी मोलाचे सहकार्य केले. आयोजकांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

तसेच या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब व पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन डॉ. संदेशजी गुजराती यांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागरिकांनी अशी शिबिरे वारंवार आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकांच्या आग्रहास्तव भविष्यातही अशा संस्कारवर्गांचे आयोजन करण्याचे आयोजकांनी मान्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *