एक फोन मदतीचा…’ संकटातील महिलांसाठी अमळनेरमध्ये हक्काचा आधार, समुपदेशन, पुनर्वसन आणि कायदेशीर सहाय्यामुळे महिलांना मिळतोय नवा आत्मविश्वास
![]()
‘एक फोन मदतीचा…’ संकटातील महिलांसाठी अमळनेरमध्ये हक्काचा आधार
समुपदेशन, पुनर्वसन आणि कायदेशीर सहाय्यामुळे महिलांना मिळतोय नवा आत्मविश्वास
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या महिला बाल विकास विभाग, गृह विभाग ,पोलीस प्रशासन सहाय्यित व आधार बहुदेशीय संस्था अमळनेर संचलित , महिला समुपदेशन केंद्र ,जुने पोलीस स्टेशन (तहसील कार्यालय )च्या आवारात चालविले जात असून केंद्रात समाजकार्य पदव्युत्तर प्रशिक्षित समुपदेशक असतात.
महिला व बालक सहाय्य कक्ष अंतर्गत महिला समुपदेशन केंद्राद्वारे महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचार व घरगुती वाद , भावनिक ताण तणाव , महिलांवरील आर्थिक छळ, मुलांचा ताबा न देणे, शारीरिक व मानसिक त्रास, व्यसनाधीनता, शैक्षणिक व महत्त्वाचे कागदपत्र हिसकावून घेणे,घरातून हाकलून देणे अशा सर्व समस्यांवर समुपदेशन, प्रत्यक्ष मदत संदर्भ सेवा, कायदेशीर सल्ला सेवा दिली जाते. समुपदेशनाच्या माध्यमातून मदत केली जाते.
महिलांना समुपदेशन सेवा, कायदेशीर मार्गदर्शन, निवारा गृहाची सोय, वैद्यकीय सेवा, विविध शासकीय योजनांची माहिती ,मोफत सरकारी वकील मिळवून देण्यासाठी मदत करणे. गरजू महिलेला पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जाते. त्याच सोबत महिलांना कायद्यांची माहिती व्हावी म्हणून
समुपदेशन केंद्रामार्फत ग्रामीण, शहरी भागात विविध कायदे , समुपदेशन केंद्राची माहिती व कौटुंबिक हिंसाचाराच्या माहितीचे हस्तपत्रक वाटप करून जनजागृती केली जाते.
शाळा व महाविद्यालयात विवाहपूर्व समुपदेशन ,कक्षा बाबतची माहिती व हेल्पलाइन नंबर याबाबतची माहिती देऊन जागरूकता निर्माण केली जाते. अश्या प्रकारे विविध उपक्रम राबविले जातात.
मागील वर्षभरात महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून 151 महिलांनी आपली तक्रार केंद्राकडे नोंदवीलि त्यातील 30 महिलांना कायदेशीर मदतीसाठी न्यायालयात पाठविण्यात आले, 91 कुटुंबांना समुपदेशन मार्फत गैरसमज दूर करून एकत्र आणण्याचे काम करण्यात आले.
महिला समुपदेशन केंद्राच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे व सहकारी, पोलिस प्रशासन,आधार संस्था अध्यक्ष डॉ.भारती पाटील , सचिव प्रा. विजयकुमार वाघमारे , यांचे सहकार्य लाभले, समुपदेशक केंद्रात समुपदेशक म्हणून श्रीमती रेणू प्रसाद व श्रीमती ज्ञानेश्वरी पाटील कार्यरत आहेत.
आपल्या ओळखीत परिसरात कुठल्याही महिलेला अडचण असेल तर आपण नक्कीच केंद्राशी संपर्क साधू शकता केंद्राचा संपर्क क्रमांक-7972339566


