अमळनेरात गिरीषभाऊ महाजनांचा वाढदिवस उत्साहात , नारळ पाणी वाटप, फळ वाटप आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन
![]()
अमळनेरात गिरीषभाऊ महाजनांचा वाढदिवस उत्साहात
नारळ पाणी वाटप, फळ वाटप आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन
अमळनेर, प्रतिनिधी :
राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. खासदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेत्या सौ. भैरवीताई वाघ यांच्या नेतृत्वात भाजप व भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवित वाढदिवस उत्साहात साजरा केला.
मंगळ ग्रह सेवा संस्था व तीर्थक्षेत्र विकास आघाडी भाजपा जिल्हा यांच्या वतीने अमळनेर-चोपडा नाका येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. तसेच मंगळ ग्रह मंदिर परिसरात मोतीबिंदू तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दरम्यान, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अमळनेरतर्फे बस स्थानक परिसरात प्रवाशांना नारळ पाणी वाटप करण्यात आले. वाढत्या तापमानामुळे प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच नर्मदा फाउंडेशन येथे रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
सदर उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन, नर्मदा फाउंडेशनचे डॉ. अनिल शिंदे, भाजपा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बाविस्कर तसेच भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी राजपूत यांचे अनमोल सहकार्य लाभल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
या उपक्रमांप्रसंगी भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन, जानवे मंडल अध्यक्ष जिजाबनाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सैनानी, माजी जि.प. सदस्य व्ही.आर. आप्पा पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष आण्णा चौधरी, डॉ. अनिल शिंदे, माजी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, हरचंद लांडगे,भारती सोनवणे, भाजपा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बाविस्कर,सरचिटणीस भरतसिंग परदेशी, देवा लांडगे,मछिंद्र लांडगे,दीपक भोई,दिलीप ठाकूर,सुभाष पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी राजपूत, कल्पेश पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष राहुल चौधरी, पातोंडा मंडल निखिल धनगर,जानवे मंडल हिरालाल पाटील, शिवकिरण बोरसे, सुमित राजपूत, यश शहा, शंतनु भावसार, राजेश खरारे, निखिल पाटील, अमोल पाटील, जाकीर मेवाती, उदय साळुंखे, मिलिंद पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



