अमळनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच धोकादायक खड्डा
![]()
अमळनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच धोकादायक खड्डा
अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार)
अमळनेर बस स्थानकावर पूर्वेकडील प्रवेशद्वारावर मोठा धोकादायक खड्डा पडल्यामुळे प्रवाशांसह बसचालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बस आगारामध्ये येताना आणि मार्गस्थ होताना या खड्ड्यां मधून जात असल्याने बसला मोठा झटका बसत असल्याने बसचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व तसेच या ठिकाणी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी साचल्यास प्रवाशांच्या अंगावर खड्ड्यात साचलेले पाणी उडत असल्यामुळे किरकोळ वादाच्या घटना होत असतात. त्यावरून प्रवासी आणि बसचालकांचे किरकोळ वादाचेही घटना घडलेल्या आहेत.
या जागी मागे मुरूमचा भराव टाकण्यात आला परंतु पावसामुळे सदर मुरूम वाहून गेल्यामुळे या जागी धोकादायक खड्डे पडलेले असल्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा खड्डा प्रवेशद्वारावर मध्यभागी असल्यामुळे कितीही कसरत केली तरी बसचालकांना टाळणे शक्य होत नाही.
तसेच पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच पाणी व चिखल साचत असल्यामुळे नागरिकांना जाताना येताना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे तरी सदर चिखल व पाण्याची विल्हेवाट लावून हा परिसर रहदारी युक्त करण्यात यावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे
तरी आगार प्रमुख व संबंधित प्रशासनाने या बाबीवर लक्ष देऊन प्रवेशद्वारावरील खड्ड्यांमध्ये मुरूम अथवा खडी टाकून सदर खड्डा बुजण्यात यावा व होणारी दुर्घटना टाळावी अशी मागणी प्रवासी वर्गापासून केली जात आहे.

