अमळनेरच्या विकासाला ऐतिहासिक दिशा देणारे स्मारक उभारणीच्या मार्गावर ,  शिवरायांच्या स्मारकाप्रमाणेच संभाजीराजांचे स्मारकही नगरपरीषदच्या पाठबळातून साकार होणार-मा.आमदार शिरीष चौधरी  , “प्रशांत निकम यांचे आश्वासन प्रत्यक्षात उतरत आहे” — माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचे गौरवोद्गार
1 min read

अमळनेरच्या विकासाला ऐतिहासिक दिशा देणारे स्मारक उभारणीच्या मार्गावर , शिवरायांच्या स्मारकाप्रमाणेच संभाजीराजांचे स्मारकही नगरपरीषदच्या पाठबळातून साकार होणार-मा.आमदार शिरीष चौधरी , “प्रशांत निकम यांचे आश्वासन प्रत्यक्षात उतरत आहे” — माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचे गौरवोद्गार

Loading

अमळनेरच्या विकासाला ऐतिहासिक दिशा देणारे स्मारक उभारणीच्या मार्गावर

शिवरायांच्या स्मारकाप्रमाणेच संभाजीराजांचे स्मारकही नगरपरीषदच्या पाठबळातून साकार होणार-मा.आमदार शिरीष चौधरी

“प्रशांत निकम यांचे आश्वासन प्रत्यक्षात उतरत आहे” — माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचे गौरवोद्गार

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील भगवा चौक येथे स्वराज्य रक्षक, महापराक्रमी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी आयोजित भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक १४ मे रोजी मोठ्या उत्साहात आणि शिवभक्तांच्या जल्लोषात संपन्न झाला. “अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठान”च्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार डॉ. बी. एस. पाटील होते. यावेळी माजी आमदार शिरीषदादा चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, डॉ. अनिल शिंदे, माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील, मनोहर नाना निकम आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. परिसरात “जय संभाजी… जय शिवराय…”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, राष्ट्रनिष्ठा, धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान आणि त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आजच्या युवकांनी संभाजी महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा अंगीकारावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमंत्रक तथा उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी केले. त्यांनी स्मारक उभारणीमागील संकल्पना स्पष्ट करताना, हे स्मारक भविष्यात शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात या स्मारकामुळे भर पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

कार्यक्रमात बोलतांना माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अमळनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आलेल्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अनेक अडचणी, विरोध आणि प्रशासकीय अडथळे आले होते. मात्र जनतेचा ठाम पाठिंबा आणि शिवप्रेमींच्या एकजुटीमुळे आज अमळनेरमध्ये महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभे राहू शकले.
याच धर्तीवर आता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे मोठे अश्वरूढ स्मारक भगवा चौकात उभारले जाणार असून, हे स्मारक शहराच्या विकासात ऐतिहासिक भर टाकणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्मारकाच्या उभारणीसाठी नगरपालिका, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच विविध सामाजिक घटकांचे सहकार्य आवश्यक राहील आणि त्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी आपल्या भाषणात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी प्रशांत निकम यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते आणि आज त्या आश्वासनाच्या पूर्ततेकडे पहिले ऐतिहासिक पाऊल टाकले जात आहे, ही आनंदाची बाब आहे.
“चांगल्या आणि समाजहिताच्या कामाला आमचे नेहमीच सहकार्य राहील. प्रशांत निकम हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहे. संभाजी महाराजांचा आशीर्वाद आणि शिवप्रेमींचे पाठबळ यामुळे हे स्मारक निश्चितच भव्यदिव्य स्वरूपात उभे राहील,” असे सांगत त्यांनी या स्मारकामुळे शहराच्या ऐतिहासिक विकासात मोठी भर पडणार असल्याचे नमूद केले. तसेच स्मारक उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्व शिवप्रेमींचे अभिनंदन करून शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करताना मनोहर नाना निकम यांनी भावनिक शब्दांत आपली भावना व्यक्त केली. “ज्या दिवशी हे भव्यदिव्य स्मारक पूर्णत्वास जाईल आणि या ठिकाणी विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी, शिवप्रेमी आणि नागरिक एकत्र येतील, तो दिवस अमळनेरसाठी सोन्याचा दिवस ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. “चांगल्या कामाला विरोध होऊ नये. अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संपूर्ण भगवा चौक परिसर भगव्या पताका, जयघोष आणि शिवभक्तांच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषात पार पडलेला हा भूमिपूजन सोहळा अमळनेरच्या इतिहासात एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद पर्व म्हणून नोंदला जाणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोहळ्यास नगरपालिकेचे पाणीपुरवठा समिती सभापती कैलास नामदेव पाटील, नगरसेवक मोहन भाऊ सातपुते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा नगरसेवक गुलाब पाटील, गटनेते महेश देशमुख, नगरसेवक प्रताप आबा साळी, सुरज परदेशी, काँग्रेस तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस
संदीप घोरपडे, मा.तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, बन्सीलाल भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, डी. ए. पाटील सर, अशोक बिऱ्हाडे , अरुण बापू देशमुख, सौ. कविता पवार, प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. गणेश पवार, इंजि. दिनकर पाटील (शिरूड), देवेंद्र देशमुख, राजेंद्र देशमुख, आनंद दुसाने साहेब, प्रा. पी. के. पाटील, ठाकरे आबा, गुणवंत पाटील, ज्ञानेश्वर पाटील (एकलहरे), कैलास भोई, संदीप पाटील (इंदवे), एन. के. पाटील (आम आदमी पार्टी), महेश पाटील सर, स्वप्निल पाटील सर, मनोहर सूर्यवंशी सर, मंदार कुलकर्णी, पत्रकार उमेश धनराळे, ईश्वर महाजन,अजय भामरे तसेच निकम परिवारातील महेंद्र भाऊ निकम, सौ. सोनल निकम, आदित्य निकम आणि समस्त भगवा चौक मित्रपरिवार व शिवप्रेमी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील सर यांनी केले. त्यांनी संभाजी महाराजांचे स्मारक हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून स्वाभिमान, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक ठरणार असल्याचे सांगितले.
भगवा चौक परिसर भगव्या पताका, घोषणाबाजी आणि शिवमय वातावरणाने भारावून गेला होता. अमळनेर शहराच्या इतिहासात हा भूमिपूजन सोहळा एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक क्षण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *