राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्काराने मुरलीधर बेडगे सन्मानित समाजसेवा, वृक्षसंवर्धन व जनजागृतीच्या कार्याची दखल
![]()
राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्काराने मुरलीधर बेडगे सन्मानित
समाजसेवा, वृक्षसंवर्धन व जनजागृतीच्या कार्याची दखल
छत्रपती संभाजीनगर : सामाजिक कार्य, वृक्षसंवर्धन, जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणारे मुरलीधर बेडगे यांना राज्यस्तरीय ‘सह्याद्री रत्न पुरस्कार–२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
९ ऑगस्ट २०२६ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे नालंदा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील नाना गोडबोले यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
मुरलीधर बेडगे हे ‘स्वराज्य देशा – विचारांचे खुले व्यासपीठ व चॅनल’चे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य असून, या माध्यमातून नामवंत व्यक्तींच्या मुलाखती तसेच समाजासाठी उपयुक्त आणि जनजागृती करणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते करतात.
तसेच वृक्षसंवर्धन समिती, वाळूज महानगरचे उपाध्यक्ष म्हणून बीज संकलन, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी त्यांचे कार्य सुरू आहे. याशिवाय गरजू, दिव्यांग मुले-मुली व वृद्धाश्रमांना अन्नधान्य वाटप, सामाजिक उपक्रम तसेच कोरोना काळात राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन अशा विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुरलीधर बेडगे म्हणाले, “हा पुरस्कार माझा नसून ‘स्वराज्य देशा’च्या संपूर्ण टीमच्या सामूहिक कार्याचा सन्मान आहे.”
पुरस्कार मिळाल्याबद्दल रुपाली पाटील, डॉ. सीमा साळवे, विशाखा रूपल, मनिषा बेडगे, व्यंकट होनाळे, माधव मुळे, गोपाळ हालसे, संतोष पालवे, गणेश जाधव, प्रदीप निडवंचे, विनोद यादव, पोपट मरकड, रामचंद्र लोखंडे, कमलेश देशमुख, राम अन्नमवार, स्वाती स्मार्थ, किरण काळे, शांतनु भागवत, विनोद सिरसाठ, अशोक पालवे दत्तात्रय सोमवंशी यांच्यासह ‘स्वराज्य देशा’ टीमच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मुरलीधर बेडगे यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक बांधिलकीला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

