मुंबई-कोकणातील शहरी शाळांना २० विद्यार्थ्यांमागे मिळणार ३ शिक्षक अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची भेट
![]()
मुंबई-कोकणातील शहरी शाळांना २० विद्यार्थ्यांमागे मिळणार ३ शिक्षक
अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची भेट
मुंबई (प्रतिनिधी) ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील शाळांमध्ये सुद्धा आता २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक मिळतील असे आश्वासन आज शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले
संचमान्यता करतांना ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता ग्रामीण प्रमाणेच शहरी भागातील संचमान्यता करणेबाबत शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे व शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉ संगीता शिंदे यांनी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मंत्रालयातील दालनात अनिल बोरनारे व संगीता शिंदे यांनी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली या चर्चेत शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी लागलीच शिक्षण आयुक्त यांना याबाबत निर्देश देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
दि.११ मे २०२६ च्या मा.उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांनी इयत्ता ९ वी व १० वी करिता ग्रामीण भागासाठी वर्ष २०२५-२६ ची संचमान्यता करताना दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास ३ शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावेत असे आदेश काढले आहेत
ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील शाळांमध्ये सुद्धा शून्य शिक्षकी शाळा झाल्या असून या शाळांमधील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी ग्रामीण भागाला दिलेले निकष शहरी भागासाठी लागू करण्यात यावे अशी मागणी डॉ संगीता शिंदे व अनिल बोरनारे यांनी केली

