सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी* *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान*
![]()
*सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी*
*श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान*
लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन (कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समता) सैतवडे, बलभिमवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स, त्यानंतर सभा, सत्कार व दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देवून या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच “हा छंद प्रियेचा” हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.लोकप्रिय दिग्दर्शक, प्रसाद धोपट व रणरागिणी ताराराणी नाटक फेम,स्टार प्रवाह वरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेमधील ‘पूजा’ अभिनेत्री ‘ज्योती निमसे आदीनी हा नाट्यप्रयोग सादर केला.न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचे भव्य पटांगणात हे कार्यक्रम पार पडले. यावेळी डॉ. मयुरेश मोहिते, अध्यक्ष स्वप्नील मोहिते, वैभव पवार, नितीन सावंत, सुरेश मोहिते, रमेश सावंत, गंगाराम पवार, महेश पवार, मुकेश पवार, सुदेश पवार, सुजित मोहिते, सुरज मोहिते, सागर मोहिते, रोहित मोहिते, सिद्धार्थ मोहिते सुधाकर मोहिते. योगेंद्र कल्याणकर, डॉ. विकी सावंत, श्रीमती ऋतुजा जाधव, राजेश जाधव, दीपक लिंगायत, उमेश रहाटे, अनिकेत सुर्वे, अरुण मोर्ये,सरपंच साजिद शेकासन, ओंकार शिर्के, अविनाश केदारी, राजेश जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

