पेसा क्षेत्रातील शिक्षण संस्थांचे रोस्टर तपासणी मार्ग मोकळा
![]()
पेसा क्षेत्रातील शिक्षण संस्थांचे रोस्टर तपासणी मार्ग मोकळा
मुंबई प्रतिनिधी
अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील रोस्टर तपासणी करून घेण्यासाठी अनेक शासन निर्णय झाले. मात्र पेसा क्षेत्रातील गावातील रोस्टर तपासणी करून मिळत नव्हते.
सदर परिस्थिती आपले लाडके आमदार व कार्यसम्राट आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना सांगितले.आमदारांनी यांनी मा श्री सुभाष आंधळे उपसचिव सामान्य प्रशासन (मावक) यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. सरांच्या प्रयत्नातून दिनांक 11/2/2026 रोजी पेसा क्षेत्रातील शिक्षण संस्थांचे रोस्टर तपासणी करण्यासाठी शासन निर्णय निघाले. परंतू त्यातही सुस्पष्ट उल्लेख नसल्याने सहायक आयुक्त कोकण विभाग यांनी मार्गदर्शन मागवले होते. सदर मार्गदर्शन पत्र लवकरात लवकर काढण्यासाठी आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी पुन्हा सतत प्रयत्न करून दिनांक 4/5/2026 रोजी प्रत्यक्ष भेटून सुधारित परिपत्रक काढायला लावले. त्यानंतर सहायक आयुक्त कोकण भवन यांच्याकडून परिपत्रक काढण्यासाठी प्रयत्न केले. आज परत सहायक आयुक्त कोकण भवन यांच्याशी बोलून पवित्र प्रणालीची शिक्षक भरती नोंदणीची मुदत लक्षात घेऊन लवकरात लवकर रोस्टर तपासणी करून देणेबाबत सुचना दिली आहे. तसेच काही अडचणी येवू नये म्हणून संस्था चालकांची मार्गदर्शन सभा लावण्यास सुचित केले आहे .दिनांक 4/5/2026 रोजी च्या मार्गदर्शक पत्रानुसार रोस्टर तयार करून तपासून घेण्यास काही हरकत नाही. असे सहायक आयुक्त कोकण भवन यांच्याकडून सांगितले.
मा. आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रयत्नामुळे पेसा क्षेत्रातील शाळांचे रोस्टर तपासणी मार्ग मोकळा झाला.त्याबद्दल पेसा क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था चालक व मुख्याध्यापकानच्या वतीने खुप खुप आभार/ धन्यवाद
आता ज्यांचे रोस्टर तपासणी करायची आहे. त्यांनी दिनांक 4/ 5/2026 च्या शासन परिपत्रकानुसार तपासणी करून घ्यावी ही विनंती.
धन्यवाद
आपला विश्वासू
श्री विठ्ठल गोरे सर
संपर्क प्रमुख
अरुण भोईर सर राज्य
सचिव
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना

