महात्मा फुले हायस्कूल मध्ये एस एस परिक्षेत प्रथम वैभव माळी – ८९% , द्वितीय शितल भोई – ८२ % , तृतीय सिद्धार्थ बैसाणे – ७६.८० %
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये एस एस परिक्षेत प्रथम वैभव माळी – ८९% , द्वितीय शितल भोई – ८२ % , तृतीय सिद्धार्थ बैसाणे – ७६.८० %
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दि. ८ मे ला दहावीचा ऑनलाईन निकाल घोषित झाला. शाळेतून प्रथम वैभव राकेश माळी – ८९ %, द्वितीय शितल भोई – ८२ %, तृतीय – सिद्धार्थ बैसाणे – ७६.८० % यांचा शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, वर्गशिक्षक एस व्ही आढावे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक एच डी माळी, एम बी मोरे , पी डी पाटील , व्ही टी माळी, एस एन कोळी, शाळेचे ज्येष्ठ लिपिक जे एस महाजन, पी डी बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन , जीवन भोई अशोक पाटील तसेच सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

