रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आरसीएफ शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या पाठपुराव्याने मंत्री ना.श्री बावनकुळे साहेब यांच्या दालनात बैठक*
![]()
*रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आरसीएफ शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या पाठपुराव्याने मंत्री ना.श्री बावनकुळे साहेब यांच्या दालनात बैठक*
========================
*रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीच्या शाळेतील शिक्षकांचे पगार, गेल्या 24 महिन्यापासून थकले होते, म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्यावर महसूल मंत्री मा. ना श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी बैठक घेऊन शिक्षकांच्या पगाराविषयी मार्ग काढू असे सांगितले होते, त्यानुसार काल दिनांक 6 मे 2026 रोजी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या पाठपुरानुसार, महसूल मंत्री आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती , सदर बैठकीस शालेय शिक्षण राज्यमंत्री माननीय श्री पंकज जी भोयर साहेब यांनी डेक्कन एज्युकेशन आणि आरसीएफ कंपनीच्या संचालकांना धारेवर धरून तात्काळ मार्क काढा असे आदेश दिले, महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी दोन्ही संचालकांना शिक्षकांचा पगार त्वरित करा अन्यथा कडक कारवाई करू अशा प्रकारची तंबीच भरली, व राज्यमंत्री पंकज जी भोयर साहेब यांनी तात्काळ या संदर्भात हेरिंग लावून डेक्कन संस्था व आरसीएफ कंपनीला जबाबदारी निश्चित करून आदेश द्यावा व शिक्षकांचे थकलेले पगार त्वरित द्यावे असा निर्णय झाला, सदर बैठकीसाठी अलिबागचे आमदार श्री महेंद्र दळवी साहेब उपस्थित होते, त्यांनीही शिक्षकांच्या वेतनाविषयी बाजू मांडली.*
*बैठकीस सहाय्यक संचालक श्री श्रीराम पानझडे साहेब, शिक्षण उपसंचालक श्री राजेश कंकाळ साहेब शिक्षण अधिकारी श्री महारुद्र नाळेसाहेब, आरसीएफ कंपनीचे मॅनेजर, डेक्कन एज्युकेशन चे प्रतिनिधी, आरसीएफ शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते*

