महालोकयोद्धा…नामदार गिरीशभाऊ महाजन* *कवी,लेखक शरद अण्णा पवार*
![]()
*महालोकयोद्धा…नामदार गिरीशभाऊ महाजन*
*कवी,लेखक शरद अण्णा पवार*
*जळगांव जिल्ह्यातील जामनेर गावातील माननीय दत्तात्रय भिका महाजन व माननीय गिताताई महाजन यांचा घरी 17 मे 1960 रोजी महालोकयोध्दा नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या जन्म झाला. माननीय श्री. दत्तात्रय महाजन हे कृषी शिक्षक होते.गुजर पाटील सर्व साधारण कुटुंब पूर्ण जामनेर गावात जनसेवा,मदत, सहकार्य महाजन परिवार करत होते. गरीब व श्रीमंत सर्वांना मदत करत असत, दुःखात व सुखात महाजन कुटुंब अग्रेसर राहत होते…*
*बालपणात गिरीशभाऊच्या मनात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज व थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आदर्श डोळे समोर ठेवून गिरीशभाऊंनी सामाजिक कार्य साठी स्वतः वाहून घेतले आहे. तसेच RSS, ABVP, जनसंघाचे विचार व भारतीय जनता पक्षाची विचारसरणी मनात रुजली गेली, माननीय डॉ.हेगडेवार, माननीय गोळवलकर गुरुजी, माननीय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी,माननीय पंडित दीनदयाल उपाध्याय, माननीय अटलजी,माननीय अडवाणीजी,लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन देश,राष्ट्र,देव,धर्म समाजसेवा या विचाराची ज्योतमनात पेटली गेली, गिरिशभाऊ यांनी शुन्यमधून विश्व तयार केलं. त्याचा करता गिरीशभाऊंना महालोकयोद्धा जनता बोलते…*
*विद्यार्थी काळात गिरीशभाऊना क्रिकेट,कबड्डी, खोखो, विटीदांडू, कुस्ती सर्व खेळात तरबेज व ऑलराऊंडर होते.तर शाळेत हुशार व चाणाक्ष होते, लहानपणापासून मित्र परिवार जोडणे, सर्वांना एकत्र घेऊन,सर्वांना सोबत घेऊन कोणतेही काम करायचं असेल तर एकजूट महत्त्वाची असते, गिरीश भाऊंनी सर्वांना सोबत घेऊन सर्व सण, उत्सव, जयंती उत्सव निमित्ताने एकत्र येऊन साजरा करणे. सेवा, समर्पण, त्याग हीच भूमिका मनात ठेवून विद्यार्थी काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP चे काम सुरू केलं 1978/79 काळात ABVP चे जामनेर चे तालुका अध्यक्ष पदी निवड झाली, 12 वीचे पूर्ण करून बी. कॉम चे शिक्षण करतांना गिरीशभाऊनी 1982/83 मध्ये कॉलेज मध्ये बीकॉम करताना जनरल सेक्रेटरी पदी निवडून आले…*
*गिरीशभाऊची 1988/90 या काळात भारतीय जनता युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष निवड झाली पुढे मग 1990/93 मध्ये गिरीशभाऊ ची जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्या काळात गिरीशभाऊचा विवाह पळसखेडा येथील साधनाताई यांचा सोबत विवाह संपन्न झाला. सौ.साधनाताई गिरीशभाऊ महाजन यांनी जामनेर जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या आहेत. गिरीशभाऊ 1992 काळात जामनेर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड,लगेच सरपंच पदावर निवड झाली,गिरीशभाऊ व साधनाताई यांना दोन कन्यारत्न जन्माला आल्या म्हणजे साक्षात लक्ष्मी घरात आल्या प्रियाताई व श्रेयाताई त्यानंतर गिरीशभाऊ यांनी राजकारणात मागे वळून कधीच पाहिले नाही.गिरीशभाऊना साधना ताई चा भक्कम साथ व पाठिंबा लाभला, गिरीश भाऊ व साधनाताई यांना राजकारणात कायम यश संपादन करत गेले…*
*गिरीशभाऊंनी 1992/92 काळात राममंदिर साठी आंदोलन केले, श्री राममंदिर साठी आंदोलन करताना गिरीशभाऊंना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला.पण भाऊमागे हटले नाही, कारण भाऊना साथ साधनाताईची, पूर्ण मित्र परिवार व संपूर्ण महाजन परिवार गिरीशभाऊ सोबत होता. रथयात्रा मध्ये महत्त्वाचा सहभाग व राममंदिर साठी मोठा सहभाग घेणारे आपले गिरीश भाऊ महाजन होते…*
*गिरीशभाऊ यांनी 1995 मध्ये जामनेर विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.तसेच जामनेर तालुक्यातील युवा आमदार महाराष्ट्र भर परिचित झाले. युवा आमदार म्हणून निवडून आले. गिरिशभाऊ यांनी 1995 निवडणूक लढवली जिंकुन खूप खूप मोठा इतिहास रचला आहे. अश्या माणसाचा पराभव केला आहे, तो माणूस पुन्हा राजकारणात व जामनेर गावात दिसला पण नाही. त्याचा करता गिरीशभाऊ महाजन यांना महालोकयोद्धा म्हणून ओळखले गेले. गिरीश भाऊंनी एक स्वतः चे व्यक्तिमत्व निर्माण केलं. गिरीशभाऊ यांनी 1995,1999,2004,2009,2014,2019,2024 सतत विधानसभा निवडणुकीत विजयी होत गेले…7 वेळ आमदार म्हणून निवडून आले,जामनेर नगरी चे आमदार म्हणून प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रभर काम केलं…*
*गिरीशभाऊ यांनी भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर काम केलं, RSS व ABVP जनसंघाचे विचार घेऊन सामाजिक कार्य व समाजसेवा जोपासली, गिरीशभाऊ यांनी हजारो परिवार साठी आरोग्य, वैद्यकीय मदत व विविध प्रकारचे कार्य केले, किडनी, हृदय,रक्तदान साठी 24 तास, 365 दिवस सेवा केली, गल्ली पासून ते मुंबईपर्यंत सर्व प्रकारच्या आजारावर सेवासाठी टीम तयार करून स्वतः लक्ष केंद्रित करुन जळगांव जिल्ह्यात एकमेव हक्काची व्यक्ती म्हणून रुग्ण साठी काम करणारा आमदार महाराष्ट्रभर महालोकयोद्धा म्हणून गिरीश भाऊंची ओळख निर्माण झाली…*
*गिरीशभाऊ यांनी राजकारणात प्रवेश केला, स्वतः साठी कधीच विचार केला नाही, देशसेवा,समाजसेवा व जनता हेच आपले घर व आपला परिवार आहे, त्याचाकरता आपल्याला काम व सेवा करायची आहे, त्याचा करता गिरीशभाऊ यांना भारतीय जनता पक्षाने भाजपा राज्य उपाध्यक्ष, जळगांव जिल्हा चे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा चे उपाध्यक्ष व चिटणीस, प्रादेशिक उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, गिरीशभाऊंनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध विविध प्रकारचे पदे घेऊन पक्षाची काम केली, गिरीशभाऊंनी भाजपा विधिमंडळ पक्षाचे प्रतोद निवडणूक म्हणून निवड झाली, विधिमंडळ मध्ये भाजप चे कामकाज पाहिले, गिरीशभाऊंनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन, मोर्चे, आमरण उपोषण, शेतकरी आंदोलन, पाण्यासाठी आंदोलन व शासकीय योजना व शासकीय निधी साठी आंदोलन केले, त्याचा करता गिरीशभाऊ महाजन हे महालोकयोद्धा म्हणून व्यक्तिमत्व उदयास आले…*
*2014 मध्ये भारत देशात सत्ता परिवर्तन घडवून आणणारे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय अमित शहा, राजनाथ सिंग, गोपीनाथ मुंडे,नितीन गडकरी यांनी देशात सत्ता व महाराष्ट्र राज्यात सत्ता परिवर्तन करून एक मोठा इतिहास घडवून आणला, त्याचा नंतर महाराष्ट्र राज्य मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार गिरीशभाऊ महाजन,भाऊसाहेब फुंडकर,विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार,चंद्रशेखर बावनकुळे व रविद्र चव्हाण यांनी खुप मेहनत कष्ट करून राज्यात सत्ता परिवर्तन केले…भाजपा सरकार स्थापन झाले…*


*2014 मध्ये जेव्हा केंद्रात माननीय नरेंद्र मोदी सरकार स्थापन झाले.त्याचा नंतर महाराष्ट्र राज्य मध्ये माननीय देवेद्र फडवणीस सरकार स्थापन झाले. तेव्हा 2014 राज्य सरकारच्या काळात नामदार गिरीशभाऊ महाजन यांना टॉप 5 मंत्रीमध्ये नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन जामनेर व जळगांव जिल्ह्याचे नाव मोठे केले.गिरीशभाऊ महाजन वर उत्तर महाराष्ट्र ची पण जबाबदारी दिली गेली, 2014/19 काळात गिरीशभाऊंनी जलसंपदा मंत्री, लाभक्षेत्र विकास मंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच नाशिक पालकमंत्री, जळगांव पालकमंत्री, नंदुरबार पालकमंत्री धुरा सांभाळली होती, अजून कुंभमेळा मंत्री उल्लेखनीय कारभार सांभाळला आहे…*
*2022 ते 2024 ग्रामीण विकास मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग मंत्री, नाशिक पालकमंत्री होते. 2023/24 पर्यटन मंत्री, 2024 नंतर जलसंपदा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, नाशिक कुंभमेळा मंत्री म्हणून महाराष्ट्र सरकार चे उल्लेखनीय कार्य करत आहे.2014 ते 2026 काळात गिरीशभाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व रोगनिदान आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित केले होते,त्याचा करता गिरीशभाऊ महाजन अखंडपने सेवा करत आहे.देशसेवा, समाजसेवा व लोकसेवा हा त्याचा आयुष्यातील प्रवास मांडला आहे…*
*माननीय नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांना वाढदिवस निमित्त खूप खूप मनापासून शुभेच्छा…17 मे 1960 , पुन्हा एकदा महालोकयोद्धा नामदार गिरीशभाऊ यांना वाढदिवस निमित्त शुभेच्छा…*
*=आपला=*
*कवी, लेखक, समाजसेवक*
*शरद (अण्णा) पवार*
*संस्थापक अध्यक्ष*
*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य*

