हिवताप दिनाचे उत्कृष्ट आयोजन; मारवड आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा गौरव
1 min read

हिवताप दिनाचे उत्कृष्ट आयोजन; मारवड आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा गौरव

Loading

हिवताप दिनाचे उत्कृष्ट आयोजन; मारवड आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथील आरोग्य सेवक योगेश रजनी वाल्मीक कापडणे यांनी जागतिक हिवताप दिन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने साजरा केल्याबद्दल त्यांना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय रनाळकर यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या यशामागे तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी व तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हिवताप दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मारवडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल चौधरी, विद्या देवरे, आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे, आरोग्य सहाय्यिका सुनीता गावित, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के. आर. साबळे, औषध निर्माण अधिकारी विलास बि-हाडे, आरोग्य सेविका ललिता तिडके, सरला परदेशी, कनिष्ठ सहाय्यक उर्मिला पाटील तसेच राजश्री पाटील, संगीता चौधरी, मंदाताई शिंदे, कल्याणी पाटील, हिरामण सेना मेढे आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *