सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांचा गौरव करत शिक्षण क्षेत्राला नवी उर्जा , प्रा. डॉ. माळी यांचे प्रतिपादन – “देश घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये”
![]()
सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांचा गौरव करत शिक्षण क्षेत्राला नवी उर्जा
प्रा. डॉ. माळी यांचे प्रतिपादन – “देश घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे नवलनगर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान, रुख्मिणीताई प्रतिष्ठान (मुंबई), संजय एज्युकेशन सोसायटी व ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीटीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा – फेब्रुवारी 2026) उत्तीर्ण शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस. ओ. माळी (माजी उपप्राचार्य, प्रताप कॉलेज, अमळनेर) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी विद्यालय, अमळनेरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. एस. डी. देशमुख, नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी आबासो. डी. बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी बापूसो. प्रा. श्याम पवार, एस एन डी टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख तसेच आर्मी स्कूलचे सेवानिवृत्त प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील व आर्मी स्कूलचे प्राचार्य बी डी पाटील उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक पी. एम. कोळी, श्री. सुनील पाटील, मुख्याध्यापिका कल्पना महंत, एच. एस. पाटील, उद्धवराव पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकात प्रा. सुनील गरुड यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी प्रेरणेचे महत्त्व अधोरेखित करत, यशस्वी शिक्षकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने संस्थेच्या अध्यक्षांच्या परवानगीने हा सन्मान आयोजित केल्याचे सांगितले. तसेच या उपक्रमातून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळून ते पुढील काळात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. श्याम पवार यांनी आपल्या मनोगतात यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
एस.डी.देशमुख यांनी शिक्षकांनी सातत्याने कार्य प्रेरित राहून शिक्षण क्षेत्रात कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. एस. ओ. माळी यांनी “शिक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे आणि देशाला पुढे नेणारे शिक्षकच आहेत” असे प्रतिपादन केले. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले शिक्षक हा रथ अधिक उंचीवर नेतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर सातत्याने संशोधन करणे, त्यांच्या शंका समजून घेऊन संवाद साधणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात संस्थेतील 12 शिक्षकांनी सीटीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित शिक्षकांची नावे व त्यांची शाळा पुढीलप्रमाणे आहेत:
श्री. देविदास धर्मा घोडेस्वार – विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर
श्री. संतोष भास्करराव पवार – विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर
श्री. शरद भिका पाटील – विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर
श्री. उमेश प्रतापराव काटे – विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर
श्री. अनिल अशोक वानखेडे – विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर
श्री. गजानन लक्ष्मण पाटील – सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, पिंपळकोठे, ता. एरंडोल
श्री. अतुल सुधाकर लोहार – सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, पिंपळकोठे, ता. एरंडोल
श्रीमती मोनाली नानाभाऊ सूर्यवंशी – सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, पिंपळकोठे, ता. एरंडोल
श्री. विशाल श्रीराम लांबोडे – सरस्वती माध्यमिक विद्यालय, सडावन, ता. अमळनेर
श्री. समाधान नगीनदास कोळी – ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय, रोटवद ता. धरणगाव
श्री. विकास पदमर – संत मीरा माध्यमिक विद्यालय, छत्रपती संभाजीनगर
श्रीमती विजया युवराज पाटील – पंडित नेहरू विद्यालय, नवलनगर
सत्कारार्थींमधून श्री. अतुल लोहार यांनी प्रतिनिधिक मनोगत व्यक्त करत संस्थेने हा सन्मान आयोजित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हा कार्यक्रम संस्थाध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत विजय पाटील तसेच मार्गदर्शिका शीलाताई विजय पाटील यांच्या संमतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशामुळे संस्थेचा व शाळेचा नावलौकिक अधिक उंचावला असल्याचे सर्वांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी मानले.

