बुद्धिमान आणि संस्कारशील युवक देशाची संपत्ती- प.पू.जनार्दन महाराज  नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाला प्रारंभ-३०० विद्यार्थ्यांचा सहभाग
1 min read

बुद्धिमान आणि संस्कारशील युवक देशाची संपत्ती- प.पू.जनार्दन महाराज नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाला प्रारंभ-३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

Loading

बुद्धिमान आणि संस्कारशील युवक देशाची संपत्ती- प.पू.जनार्दन महाराज

नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाला प्रारंभ-३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव प्रतिनिधी – बुद्धिमान आणि संस्कारशील युवक ही देशाची खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन परमपूज्य जनार्दन महाराज यांनी केले .सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या सतपंथ शिष्यवृत्ती महाभियानाच्या परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे,उपमहापौर मनोज चौधरी, शिक्षणाधिकारी निलेश पाटील ,नगरसेवक नरेंद्र पाटील, ग्लोबल मिशन स्कूल बाहुटेचे चेअरमन मनोहर पाटील ,नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील मंचावर उपस्थित होते.
समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशन तर्फे 50 हून अधिक विद्यार्थ्यांना यूपीएससी ,एमपीएससी, जेईई ,नीट परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण तसेच निवास व भोजनाची व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी आज रोजी प्रवेश परीक्षा जळगाव धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी संपन्न झाली.तीनशे हून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षेला उपस्थिती दिली.
पुढे बोलताना श्री जनार्दन महाराज म्हणाले की ,शिक्षणासाठी समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करणे सामाजिक दायित्व आहे.एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत.धर्माचे कार्य करताना शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारशील व राष्ट्राची सेवा करणारा युवक घडावा यासाठी हा उपक्रम सुरू करीत आहोत.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी आपल्या अनुभव कथनातून उपस्थित युवकांना प्रेरणा दिली . एका संत महात्म्याने शिक्षण क्षेत्रात एवढे भरीव कार्याला प्रारंभ करावा ही देशासाठी अभिमानाची बाब आहे असेही ते म्हणाले.
आमदार राजू मामा भोळे म्हणाले की ,सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्प हा जळगाव येथील एक दिशादर्शक प्रकल्प आहे. या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महापौर मनोज चौधरी ,नरेंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जयदीप पाटील यांनी प्रास्ताविकातून शिष्यवृत्ती महाअभियानाची पार्श्वभूमी आणि पुढील उद्दिष्टे सांगितले.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खानदेश स्तरीय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विमोचन करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप पाटील यांनी तर आभार रमेश पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील ,अक्षय देवरे ,विवेक साळुंखे ,तुषार पाटील, प्रशांत तायडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *