नेमबाज महालेचा जागतिक रंगमंचावर प्रवेश
![]()
थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 साठी कल्पेश महाले यांची निवड
एअरगन असोसिएशन ऑफ इंडिया मार्फत नुकत्याच गोवा येथे संपन्न झालेल्या 12 व्या राष्ट्रीय रायफल ॲण्ड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेत ओपन गटात 10 मीटर ब्रेक बॅरल रायफल या प्रकारात चाळीसगाव येथील कल्पेश विजय महाले यांनी यश संपादन केले असून पुढील भारत विरुद्ध थायलंड या आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 साठी निवड झाली असून ही स्पर्धा 4 मे ते 7 मे 2026 दरम्यान बँकॉक थायलंड येथे होणार आहे.
कल्पेश महाले यांना एअरगन असोसिएशन ऑफ इंडियन राज्य सेक्रेटरी मदन बदर व जनरल सेक्रेटरी लवकुमार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच कल्पेश महाले यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल व्हाईस
ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे व सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे…

