सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना ग्रॅच्युटीची रक्कम देण्याचा कामगार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाडा. ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. कायदेशीर लढा यशस्वी – रामकृष्ण बी.पाटील*
![]()
सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना ग्रॅच्युटीची रक्कम देण्याचा कामगार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाडा.
ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
कायदेशीर लढा यशस्वी – रामकृष्ण बी.पाटील*
जळगांव प्रतिनिधी
जळगांव जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी मा. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्यासाठी कामगार न्यायालयात ऑक्टोंबर 2025 मध्ये अंगणवाडी युनियनचे रामकृष्ण बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दावे दाखल करण्यात आले होते.
सदर प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनीस यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उपदान प्रदान अधिनियम नुसार सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनीसांना उपदानाची (ग्रॅच्युटी) रक्कम सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून १० टक्के व्याजासह तक्रारदाराला देण्यात यावी. असा महत्त्वपूर्ण आदेश कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती आर.बी.ठाकूर यांनी जिल्हा परिषदेला दिला.
सदर निकालामुळे सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनीसांना एक रकमी सेवासमाप्ती लाभाव्यतिरिक्त सुमारे ७० हजार ते तिन लाखापेक्षा अधिक ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
सदर प्रकरणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने ॲड.एस.बी.पाटील, ॲड.चैतन्य बर्गे यांनी तर जिल्हा परिषदेतर्फे ॲड.वाय.बी.कोळी यांनी कामकाज पाहिले.
कामगार न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाहसाठी आर्थिक आधार मिळाला आहे. त्यामुळे तक्रारदार अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी यापुढेही सर्व स्तरावर लढे सुरूच राहतील.असे युनियनचे रामकृष्ण बी.पाटील यांनी म्हटले आहे.

