अमळनेरची मान उंचावली! , अर्चना वाघ यांची जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड
1 min read

अमळनेरची मान उंचावली! , अर्चना वाघ यांची जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड

Loading

अमळनेरची मान उंचावली!

अर्चना वाघ यांची जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी घडामोड घडली असून, श्रीमती अर्चना गंभिरराव वाघ (भामरे), उपशिक्षिका, नवीन मराठी शाळा (लोकमान्य शिक्षण मंडळ, अमळनेर) यांची नॅशनल ह्युमन राईट्स अँड अँटीकरप्शन सोशल जस्टिस फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या प्रतिष्ठित संस्थेच्या जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीची घोषणा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रफुल (दादासो) सिताराम पाटील तसेच महिला विभागाच्या राज्यस्तरीय नेतृत्वातील प्रा. श्रीमती मंदाकिनी भामरे (महिला अध्यक्ष, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) यांच्या हस्ते करण्यात आली.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक जाणीवा जपणाऱ्या आणि महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या अर्चना वाघ यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, संस्थेमध्ये दादासो प्रफुल सिताराम पाटील यांची स्टेट प्रेसिडेंट म्हणून निवड ह्यूमन राईट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासो अशोक पवार यांच्या वतीने करण्यात आली असून, या दोन्ही नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळणार आहे.
सौ अर्चना वाघ यांच्या या यशस्वी निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अमळनेरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात पुन्हा एकदा अभिमानाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *