उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आण्णासाहेब भागवत यांच्या खांद्यावर; धनगर समाज महासंघात मोठी जबाबदारी
![]()
उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आण्णासाहेब भागवत यांच्या खांद्यावर; धनगर समाज महासंघात मोठी जबाबदारी
चांदवडच्या राजवाड्यात नियुक्तीपत्र प्रदान; मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाचा क्षण
अमळनेर प्रतिनिधी) : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली यांच्या वतीने आण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीमुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर नियुक्तीचे पत्र चांदवड येथील ऐतिहासिक राजवाड्यात राजे मल्हारराव होळकर यांच्या मामांचे वंशज आदरणीय अमरजित राजे बारगळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रविण काकडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या सन्माननीय सोहळ्यावेळी मा. सोमनाथ कर्णवार, सरपंच निंबा तात्या कंखरे, सरपंच नंदलाल धनगर, देविदास हटकर, सचिन सांगोरे, पाकळे दादा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आण्णासाहेब भागवत यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
आण्णासाहेब भागवत यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. समाधान धनगर, नितीन निळे, एस. सी. तेले, रमेश शिरसाठ, गोपिचंद शिरसाठ, रविंद्र लाळगे, जयप्रकाश लांडगे, हरचंद लांडगे, प्रभाकर लांडगे, प्रदीप कंखरे, गजानन धनगर, दिनेश भलकार, जिभाऊ कंखर, भाऊलाल पाटील, विकास सूर्यवंशी, दिलीप ठाकरे, तुषार इधे, आनंदा हळप, आनंदा धनगर, रविंद्र भालेराव, डी. एस. धनगर, जगदीश भागवत, आर. सी. भालेराव, अशोक कंखरे, अर्जुन भागवत, लक्ष्मण निळे, बाळू देवकाते, प्रदीप रावण कंखरे, आर. पी. धनगर आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रात धनगर समाजाचे संघटन अधिक बळकट होईल, तसेच समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आण्णासाहेब भागवत प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

