कळमसरे गावावर शोककळा; सकाळी 10 वाजता संभाजीनगर येथे वासुदेव भावलाल महाजन यांचे आकस्मिक निधन ,  संभाजीनगर येथे शेवटचा श्वास; दुपारी 4 वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा – गावात हळहळ, महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर
1 min read

कळमसरे गावावर शोककळा; सकाळी 10 वाजता संभाजीनगर येथे वासुदेव भावलाल महाजन यांचे आकस्मिक निधन , संभाजीनगर येथे शेवटचा श्वास; दुपारी 4 वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा – गावात हळहळ, महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर

Loading

कळमसरे गावावर शोककळा; सकाळी 10 वाजता संभाजीनगर येथे वासुदेव भावलाल महाजन यांचे आकस्मिक निधन

संभाजीनगर येथे शेवटचा श्वास; दुपारी 4 वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा – गावात हळहळ, महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासाठी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना आज घडली आहे. कळमसरे येथील आदरणीय व्यक्तिमत्व, आप्पासो कै. वासुदेव भावलाल महाजन यांचे आज दिनांक 20 एप्रिल 2026, सोमवार रोजी सकाळी 10:00 वाजता संभाजीनगर येथे आकस्मिक दुःखद निधन झाले.
त्यांच्या अकस्मात जाण्याने कळमसरे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. साधेपणा, आपुलकी आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सर्वांच्या मनात दाटून आली आहे. महाजन कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून, नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये शोकसागर उसळला आहे.
स्व. वासुदेव महाजन यांची अंत्ययात्रा आज दुपारी ठीक 4:00 वाजता त्यांच्या राहत्या घरातून, कळमसरे येथून निघणार आहे.
या दुःखद प्रसंगी श्री. मुरलीधर राजाराम महाजन (भाऊ) – माजी सरपंच, कळमसरे ग्रामपंचायत, श्री. भरत राजाराम महाजन (भाऊ), श्री. संजीव भावलाल महाजन (भाऊ) तसेच कु. धिरज वासुदेव महाजन (मुलगा) व समस्त नेरकर परिवार, कळमसरे ता. अमळनेर, जि. जळगाव हे शोकाकुल असून, त्यांच्या दुःखात संपूर्ण गावकरी सहभागी झाले आहेत.

(प्रखर जनसंवाद व मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…
💐💐)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *