साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक चित्रकार श्री राजू बाविस्कर यांचा जळगांव ला समरसता साहित्य परिषदेच्या “काव्यजागर” संमेलनात सत्कार
1 min read

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक चित्रकार श्री राजू बाविस्कर यांचा जळगांव ला समरसता साहित्य परिषदेच्या “काव्यजागर” संमेलनात सत्कार

Loading

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक चित्रकार श्री राजू बाविस्कर यांचा जळगांव ला समरसता साहित्य परिषदेच्या “काव्यजागर” संमेलनात सत्कार

समरसता साहित्य परिषद जळगांव द्वारा क्रांती ज्योती महात्मा फुले जयंती तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दि. १२ एप्रिल रोजी “काव्यजागर” कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. थोर महापुरुषांचे कार्य आणि सामाजिक आशयावर आधारित या संमेलनात ३० कवींनी मराठी, हिंदी, अहिराणी तसेच लेवागण बोलीभाषेत उत्कृष्ठ कविता आणि गझल सादर केल्यात. कवी संमेलन अध्यक्षपदी ख्यातनाम कवी श्री वा. ना. आंधळे तर प्रमुख अतिथी म्हणून नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्री राजू बाविस्कर, प्रा. सौ. संध्याताई महाजन, लेखक दिपक तांबोळी, समरसता साहित्य परिषद जळगांव चे अध्यक्ष श्री सुभाष मराठे आणि समरसता साहित्य परिषदेचे प्रांत कार्यवाह श्री नरेंद्र निकुंभ सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर थोर महापुरुषांचे प्रतिमा पुजन करुन उपस्थित मान्यवर संमेलनाध्यक्ष आणि प्रमुख अतिथींचा स्वागत सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा परिचय श्री प्रकाश बारी यांनी करुन दिला. तसेच विशेष सत्कारात “काळ्यानिळ्या रेषा” या आत्मकथनासाठी २०२५ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक चित्रकार श्री राजू बाविस्कर यांचा शॉल श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ ऐवजी गुलाब पुष्प रोपटे देवून संमेलनाध्यक्ष श्री वा. ना. आंधळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री राजू बाविस्कर सरांनी सांगितले की मी या आत्मकथनात माझा जो संघर्ष लिहिला आहे तो संघर्ष ज्यांनी कुणी अनुभवला आहे त्या सर्वांचे ते आत्मकथन आहे आणि तसेच त्याला प्राप्त साहित्य अकादमी पुरस्कारही त्या सर्वांचाच आहे. त्यांच्या सत्काराला उत्तर पर संबोधनातून एवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही माणसाने जमिनीवर कसे रहावे हे त्यांच्या प्रत्येक वाक्यातून क्षणोक्षणी जाणवत होते. अध्यक्षीय भाषणात श्री आंधळे सरांनी त्यांच्या पहिल्या कवितेपासून ते आतापर्यंतच्या साहित्य प्रवासाचा मागोवा घेत सर्वच कवींना त्यांनी नेहमीच चांगली कवीता कशी असावी यासाठीचे मार्गदर्शन केले. त्यांच्या पर्यंत कळत नकळत पोहोचलेल्या सर्व कवितांसाठी त्यांनी त्या त्या कवींना उपयुक्त मार्गदर्शन करुन शाबासकीची थापही दिल्याचे सांगत त्यांचा स्पष्ट वक्तेपणा उपस्थितांसमोर मांडत होते. सौ. संध्या ताईंनी समरसता विषयावर मार्गदर्शन करीत “सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक” या आदरणीय दाभोळकर यांच्या शब्दांत समरसता विषयाचा आढावा घेतला. तसेच सर्वच भाषांमध्ये कवितेबरोबरच गझल सादरीकरणाने समरसतेला आपण सर्व जण जागलो हे त्यांनी म्हणताच त्याला संमेलनाध्यक्ष श्री आंधळे सरांनी ही दुजोरा दिला. सर्व उपस्थित कवींना सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सुत्रसंचलन श्री सुभाष मराठे आणि सौ मनिषा उपासनी यांनी करत कार्यक्रमात रंगत आणली. शेवटी श्री सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर, कवी तसेच सभागृह संचालक, समरसता परिषदेचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू या सर्वांचे शब्दसुमनाने आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री सुरेश कुलकर्णी, सुभाष मराठे, मानसी उपासनी, इंदिरा जाधव, डॉ मनिषा महाजन, देशमाने काका,भिकाभाऊ भोई सर, प्रभाकर धनगर साहेब, रविंद्र सपकाळ तसेच. भानूदास चव्हाण,कैलास ठाकूर सर यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *