ज्ञान, समता आणि संविधानाचा जागर!” रणाईचे माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
![]()
“ज्ञान, समता आणि संविधानाचा जागर!” रणाईचे माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
रणाईचे (प्रतिनिधी)
भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मा. श्री. महेश मालोजीराव पाटील होते. प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. डी.डी. इन्शुलकर सर यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत प्रेरणादायी भाषणे, कविता आणि विचार मांडले.
यावेळी श्री. बी.डी. ठाकरे सर यांनी आपल्या मनोगतातून “डॉ. आंबेडकरांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे आहेत” असे प्रतिपादन केले. तसेच मुख्याध्यापक श्री. डी.डी. इन्शुलकर सर यांनी भारतीय संविधानातील महत्त्वपूर्ण तरतुदींविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात श्री. पी.डी. पाटील, श्री. व्ही.एस. कापडणीस, श्रीमती एस.आर. पाटील, श्रीमती रीना पाटील, श्री. डी. व्ही. देसले तसेच लिपिक श्री. एल.व्ही. पाटील व शिपाई श्री. जी.टी. पाटील यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी प्रतिनिधींनी केले होते. शेवटी सर्वांनी संविधानातील नियमांचे पालन करण्याचा संकल्प करून महामानवाला अभिवादन केले.
ज्ञान, समता आणि न्यायाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणेचा नवा दीप प्रज्वलित केला.

