समता, शिक्षण आणि स्वाभिमानाचा जागर”; परिश्रम निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
1 min read

समता, शिक्षण आणि स्वाभिमानाचा जागर”; परिश्रम निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Loading

“समता, शिक्षण आणि स्वाभिमानाचा जागर”; परिश्रम निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पारोळा प्रतिनिधी

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, वंजारी खुर्द येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांच्या समता, शिक्षण, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विशेषतः वंचित आणि दुर्बल घटकांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली.
विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत, बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमला होता.

कार्यक्रम शेवटी अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *