ब्राह्मणवेल माध्यमिक विद्यालय संगणक दालनाचे उद्घाटन
1 min read

ब्राह्मणवेल माध्यमिक विद्यालय संगणक दालनाचे उद्घाटन

Loading

ब्राह्मणवेल माध्यमिक विद्यालय संगणक दालनाचे उद्घाटन

धुळे प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील माळमाथा विभागातील ब्राम्हणवेल येथील जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी संचलित कै. बळीराम दादा माध्यमिक विद्यालय मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशतकीय जयंती व भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता समरसता पंधरवाडा चे औचित्य साधून पुणे येथील युवक मित्र परिवार यांच्या संगणक साक्षरता अभियन उपक्रम अंतर्गत माध्यमिक विद्यालयास चार संगणक उपलब्ध करून दिलेले होते . यासाठी युवक मित्र परिवार नंदुरबार चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रवीण महाजन व त्यांचे पदाधिकारी यांनी मोलाची मदत केली या संगणक दालनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्रीमान काकासाहेब एकनाथ बळीराम महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सीलाल माळी, विज्ञान शिक्षक श्री काशिनाथ माळी , इंग्रजी शिक्षक श्री बाजीराव निकुंभ , कलाशिक्षक श्री हिरामण सोनवणे व श्री रविंद्र सुर्यवंशी आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री चेतन महाजन , श्री पंडीत खैरनार , श्री सुनिल ठाकरे हजर होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *