अमळनेरात धावला एकतेचा संदेश; भव्य मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद  ,फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य व सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम
1 min read

अमळनेरात धावला एकतेचा संदेश; भव्य मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद ,फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य व सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम

Loading

अमळनेरात धावला एकतेचा संदेश; भव्य मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य व सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्य, सामाजिक ऐक्य आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रभावी संदेश दिला.
स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, PSI काकडे, पोलिस कॉन्स्टेबल विनोद सदनशिव, सिद्धार्थ शिसोदे, किरण पाटील (पत्रकार) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक-युवतींसह विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

स्पर्धेतील विजेते :
पुरुष गटात तेसज सपकाळे (नाशिक) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश वारुडे (नाशिक) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील खुमानसिंग ठाकरे यांनी तृतीय क्रमांक मिळवून आपली छाप पाडली. विजेत्यांना अनुक्रमे ७०००, ५००० आणि ३००० रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महिला गटात उन्नती पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आरती पाटील यांनी द्वितीय, तर ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक मिळवला. महिला विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३००० आणि २००० रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव, अविनाश संदानशिव, गौतम मोरे, देवदत्त संदानशिव, सुनील वाघ, सुनील करंदीकर, गोपीचंद चव्हाण, राहुल संदानशिव, श्रीचंद चव्हाण, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर संदानशिव, गोकुळ बिऱ्हाडे, प्रा. कृष्णा संदानशिव, नितीन संदानशिव, स्वप्नील पाटील, भिका संदानशिव, राजेंद्र संदानशिव, समाधान बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे, दिनेश संदानशिव, जितेश संदानशिव, तुषार संदानशिव, परम चव्हाण, शुभम घोलप, अभिषेक संदानशिव, प्रेम बैसाने, सागर बिऱ्हाडे, सुमेध मोहिते, दीपक सोनवणे, विजय संदानशिव, गणेश ब्रह्मे, काशिनाथ संदानशिव, संदीप सदानशिव, संदीप वाघ, राजरत्न सोनवणे, नाना पाटील आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रप्रभा नेतकर, नीलिमा जाधव, अनिता जाधव, किरण चव्हाण, वर्षा चव्हाण, सुनंदा संदानशिव, दिपाली संदानशिव, सोनल पवार, नितल चव्हाण, गौतमी चव्हाण आदींची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता सामाजिक एकात्मता, प्रेरणा आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करणारे प्रभावी माध्यम ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *