एन.एस.यू.आय.ची संघटन बळकटीसाठी आक्रमक भूमिका; सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेत निर्धार विद्यार्थी प्रश्नांवर ठोस भूमिका, ग्रामीण-शहरी पातळीवर विस्ताराचा संकल्प**
![]()
एन.एस.यू.आय.ची संघटन बळकटीसाठी आक्रमक भूमिका; सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेत निर्धार
विद्यार्थी प्रश्नांवर ठोस भूमिका, ग्रामीण-शहरी पातळीवर विस्ताराचा संकल्प**
मुंबई प्रतिनिधी
गोपुरी आश्रम, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आज एन.एस.यू.आय.च्या वतीने महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेला एन.एस.यू.आय.चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास गावडे, एन.एस.यू.आय. प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे, प्रदेश महासचिव ॲड. कौस्तुभ पाटील तसेच सचिव निशांत देशमुख उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेमध्ये संघटन बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संघटनेची पकड मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच ग्रामीण व शहरी भागात एन.एस.यू.आय.चे जाळे अधिक विस्तारण्याचा संकल्प यावेळी मांडण्यात आला.
संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी युवकांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणे, नवीन नेतृत्वाला संधी देणे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी ठोस भूमिका घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. आगामी काळात विद्यार्थी हिताच्या विविध आंदोलनांद्वारे आणि जनजागृती मोहिमांद्वारे संघटना अधिक सक्षम व गतिमान करण्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

