सार्वजनिक विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
![]()
*सार्वजनिक विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
असोदा:- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष अनिलदादा महाजन, संस्थेचे सचिव विलासदादा चौधरी यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. मंचावर पर्यवेक्षक लालसिंग पाटील, ज्येष्ठ शिक्षिका शुभांगीनी महाजन,विलास सावदेकर उपस्थित होते. शिक्षक किरण तायडे यांनी विद्यार्थ्यांना थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना चौधरी तर आभार हेमलता सोळंके यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

