प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना यशाची दिशा; गुणवंतांचा सन्मान आणि मार्गदर्शनाचा लाभ
![]()
प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना यशाची दिशा; गुणवंतांचा सन्मान आणि मार्गदर्शनाचा लाभ
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात करिअर कौन्सिलिंग सेंटर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात संपन्न झाले.
या बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून करियर कौन्सिलिंग सेंटरचे माजी विभाग प्रमुख तथा वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. एस ओ माळी सर याचप्रमाणे एडवोकेट चंद्रभान पाटील, संचालक शिखर अकॅडमी, अमळनेर हे उपस्थित होते. यावेळी विचारमंचावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे अधिसभा सदस्य डॉ.धीरज वैष्णव, इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनंजय चौधरी,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे, करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे आदी उपस्थित होते.
प्रस्तुत बक्षीस वितरण समारंभाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 199 वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर डॉ. विजय तुंटे यांनी करिअर कौन्सिलिंग सेंटर मधील विविध उपक्रम, त्यामागचा हेतू आणि विद्यार्थी घडण्याच्या प्रक्रिया संदर्भात प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले, तदनंतर प्राध्यापक डॉ माळी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आणि करिअर कौन्सिलिंग सेंटरची वाटचाल यावर समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा दिल्या.
एडवोकेट चंद्रभान पाटील यांनी स्पर्धा परीक्षेत सातत्य, सकारात्मकता,इच्छाशक्ती,जिद्द, संयम याबाबी फार महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास कदापी सोडू नये आणि स्पर्धा परीक्षाचे पॅटर्न नीटपणे समजून घ्यावे अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले.
यावेळी अधिसभा सदस्य डॉ धीरज वैष्णव यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना भावी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ जाधव यांनी महाविद्यालयाची वाटचाल, करिअर कॉन्सनिंग सेंटर मधील उपक्रम आणि सन 2025- 26 मध्ये सीसीएमसी विभागात अनेक पुस्तकांची केलेली खरेदी त्यांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत आपल्या कौशल्याचा वापर करून परिश्रमपूर्वक अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे, अशा पद्धतीच्या शुभेच्छा प्राचार्य डॉ जाधव यांनी दिल्या.
तदनंतर गेल्या वर्षभर विविध सामान्य ज्ञान परीक्षेचे निकाल घोषित करण्यात आले ते पुढील प्रमाणे आहे :
*भगवान महावीर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.आंबेडकर जयंती निमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल*(१४ एप्रिल २०२५)-
१) प्रथम- स्वप्नील गुलाब पाटील
रुपये-१०००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
२) द्वितीय- विशाल रमेश पाटील
रुपये-७००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
३) तृतीय- प्रितेश पोपट बोढरे,
रवींद्र हिरामण ठाकरे
(विभागून)
रुपये-५००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
४) उत्तेजनार्थ प्रथम –
आकाश शांताराम चौधरी
रुपये-३००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
५) उत्तेजनार्थ द्वितीय-
सुरज भटू पाटील
रुपये-२००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
*स्वातंत्र्य दिन निमित्ताने सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल*(१५ ऑगस्ट २०२५)
१) प्रथम- उमेश संजय कुंभार
रुपये-१०००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
२) द्वितीय- कल्पेश संजय पाटील
रुपये-७००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
३) तृतीय- रोहित संतोष कुंभार
रुपये-५००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
४) उत्तेजनार्थ प्रथम-
मयूर माणिक नेरकर
रुपये-२००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
५) उत्तेजनार्थ द्वितीय-
प्रथम सुरेश पाटील
रुपये-२००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
६) उत्तेजनार्थ तिसरे-
पूजा अनिल पाटील
रुपये-२००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह.
*26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताक दिन निमित्त घेतलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा निकाल*
१) प्रथम- उमेश संजय कुंभार
रुपये-१०००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
२) द्वितीय (विभागून)-
अभिषेक विलास भावसार,
रुपेश रोहिदास पाटील
रुपये-७००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
३) तृतीय-निलेश संजय लोंढे,
रुपये-५००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
४) उत्तेजनार्थ प्रथम –
मुकेश निंबा माळी
रुपये-२००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
५) उत्तेजनार्थ द्वितीय-
पूजा अनिल पाटील
रुपये-१००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
६) उत्तेजनार्थ द्वितीय-
हितेश गजानन निकम
रुपये-१००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
*छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल(१९ फेब्रुवारी २०२६)*-
१) प्रथम-सुयोग सुनिल कचरे
रुपये-११००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
(स्व.गोविंदादा मुंदडे यांच्या
स्मरणार्थ)
२) द्वितीय- रुपेश रोहिदास
पाटील
रुपये-९००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
(शिखर अकॅडमी)
३) तृतीय- विक्रम महाजन
रुपये-७००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
(स्व.गोविंदादा मुंदडे यांच्या
स्मरणार्थ)
४) उत्तेजनार्थ प्रथम-
कल्पेश संजय पाटील
रुपये-५००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
(शिखर अकॅडमी)
५) उत्तेजनार्थ द्वितीय-
मोहिनी प्रमोद पाटील
रुपये-५००,प्रमाणपत्र व
सन्मान चिन्ह
(शिखर अकॅडमी)
प्रस्तुत स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क घेण्यात आले नाही.
*नव नियुक्त पोलिसांचा सत्कार*-
१) कल्पेश संजय पाटील
(ठाणे शहर पोलीस निवड)
२) सागर पाटील
(ठाणे शहर पोलीस निवड)
३) साहिल संदानशिव
(पालघर शहर पोलीस निवड)
यांचा सत्कार उपस्थित मान्यवर
व प्राध्यापकांच्या हस्ते
करण्यात आले.
प्रस्तुत बक्षीस समारंभ करिता ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवी बाळसकर, डॉ.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.विलास गावित,प्रा.दिलीप तडवी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.बालाजी कांबळे, दिलीप शिरसाठ, पराग पाटील, प्रा.हिमांशू गोसावी, प्रा.अमोल अहिरे,डॉ.आकाश गव्हाणे,डॉ.हर्ष नेतकर,विशाल अहिरे,नंदूसिंग पाटील,तुषार पाटील,रमा चव्हाण यांनी परिश्रम घेतले.प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर सी सरवदे,रुसा सन्वयक डॉ मुकेश भोळे, पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.अमित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आफ्रिन पठाण यांनी केले तर डॉ.धनंजय चौधरी यांनी आभार मानले.

