अज्ञानाकडून ज्ञानाकडे , अमानुषतेकडून मानवतेकडे समाज आणि देशाला घेवून जाणाऱ्या क्रांतिसूर्याचे नाव महात्मा फुले — किरण सोनावणे , महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१ व्याख्यानांचा डॉ निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ,  शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभाग राबविणार राज्यभर उपक्रम- अनिल बोरनारे
1 min read

अज्ञानाकडून ज्ञानाकडे , अमानुषतेकडून मानवतेकडे समाज आणि देशाला घेवून जाणाऱ्या क्रांतिसूर्याचे नाव महात्मा फुले — किरण सोनावणे , महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१ व्याख्यानांचा डॉ निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ, शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभाग राबविणार राज्यभर उपक्रम- अनिल बोरनारे

Loading

अज्ञानाकडून ज्ञानाकडे , अमानुषतेकडून मानवतेकडे समाज आणि देशाला घेवून जाणाऱ्या क्रांतिसूर्याचे नाव महात्मा फुले — किरण सोनावणे

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१ व्याख्यानांचा डॉ निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ

शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभाग राबविणार राज्यभर उपक्रम- अनिल बोरनारे

मुंबई (प्रतिनिधी) समाजातील विषमता, शोषण, लिंगभेद , धर्मांधता आणि जातीयता यावर आसूड ओढून समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे , अमानुषतेकडून मानवतेकडे समाज आणि देशाला घेवून जाणाऱ्या क्रांतिसूर्याचे नाव महात्मा फुले असल्याचे प्रतिपादन जेष्ठ अभ्यासक व विचारवंत किरण सोनावणे यांनी केले महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त शिक्षक महासंघ, मुंबई व कोकण विभागातर्फे आयोजित “२०१ शाळा व महाविद्यालयांमधील २०१ व्याख्याने आणि शिक्षकांशी संवाद” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ विधान परिषद सदस्या डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते चर्चगेट येथील ब्लॉसम इंग्लिश स्कूलमध्ये झाला त्यावेळी किरण सोनावणे बोलत होते यावेळी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे कार्याध्यक्ष सुभाष अंभोरे दक्षिण विभाग अध्यक्ष सचिन पांडे उपाध्यक्ष विजय धनवडे विदर्भ संपर्कप्रमुख संतोष मेढे यांच्यासह चर्चगेट परिसरातील विविध शाळा महाविद्यालयातील दोनशेहून अधिक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ निलम गोऱ्हे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की
महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता, स्त्री सक्षमीकरण, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हक्क आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या जन्माला दोनशे वर्षे होत असली, तरी समाजातील विषमता पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे महात्मा फुले यांचे कार्य आणि त्यांच्या विचारांची लढाई अद्याप अपूर्ण असून, ती पुढे नेण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आजही अनेक शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता यांसारखे प्रश्न आहेत. या समस्यांवर लक्ष देतानाच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, समानता आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती निर्माण करणे आवश्यक आहे. शाळेतील शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणिवा घडविणारे असले पाहिजे.”
महात्मा फुले यांच्या काळात सर्वच मुलांना, विशेषतः मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मुलींना शिकवल्यास त्या बिघडतील आणि संस्कृती धोक्यात येईल, अशा गैरसमजांमुळे त्यांच्या शिक्षणाला विरोध केला जात होता. या अन्यायकारक व्यवस्थेला महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी धैर्याने आव्हान दिले. विरोध, अपमान आणि बहिष्कार सहन करून त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि शिक्षणाची दारे खुली केली, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

१० हजार शिक्षक व १ लाख विद्यार्थ्यांपर्यंत उपक्रम राबविणार

शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागाच्या वतीने २०१ शाळा व महाविद्यालयांमधील १० हजार शिक्षकांच्या मार्फत राज्यातील १ लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम येणार असून शिक्षकांशी संवाद साधणार असल्याचे प्रास्ताविक करतांना शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले
या वेळी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *