डी. आर. कन्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
![]()
डी. आर. कन्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
अमळनेर प्रतिनिधी :
खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदी रघुनाथ (डी. आर.) कन्या शाळा, अमळनेर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती (११ एप्रिल) मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर, पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ सर, जेष्ठ शिक्षक श्री एस. एस. माळी, श्री एस. एस. वाघ, जेष्ठ शिक्षिका श्रीमती एस. आर. सोनवणे, कार्यालयीन कर्मचारी श्री शामभाऊ पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी मनुभाऊ दीक्षित तसेच सौ. पी. पी. जोशी यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
या प्रसंगी महात्मा फुले यांच्या समाजसुधारक कार्याचा व शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींना त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून देत, समता, शिक्षण आणि समाजसेवा या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थिनींनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरणात रूपांतर करून देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.

