वाघ नगरमध्ये मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
वाघ नगरमध्ये मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२६, शनिवार रोजी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाघ नगर येथील रोहिदास मंगल कार्यालयात ‘सारा फाउंडेशन’ व ‘भीमकन्या ग्रुप, जिजाऊ नगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने भव्य मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला वाघ नगर, जिजाऊ नगर, कोल्हे हिल्स तसेच हरिविठ्ठल नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. नेत्र व सर्वसाधारण आरोग्य तपासणीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास आमदार मा. राजुमामा भोळे, उपमहापौर मा. मनोज चौधरी, नगरसेवक मा. अनिलभाऊ अडकमोल, मा. भूषण लाडवंजारी, सारा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत भालेराव, उपाध्यक्षा सौ. सुरेखा भालेराव, डॉ. सागर भालेराव तसेच मा. जयसिंगजी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार राजुमामा भोळे यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. त्यांनी डॉक्टरांच्या टीमचा महापुरुषांची पुस्तके देऊन सत्कार केला व महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवकल्याणासाठीच्या कार्याचा गौरव केला.
श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने नेत्रतज्ञ डॉ. जयेश वाल्हे तसेच होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. स्वाती सोनवणे व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधांचेही वितरण करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ सल्लागार व मान्यवरांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वांद्रे सर यांनी प्रभावीपणे केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.

