महात्मा फुले जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये समता परिषदेचे अभिवादन ,  विविध सामाजिक संघटनांचा सहभाग; फुले विचारांचा जागर करत समतेचा संदेश
1 min read

महात्मा फुले जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये समता परिषदेचे अभिवादन , विविध सामाजिक संघटनांचा सहभाग; फुले विचारांचा जागर करत समतेचा संदेश

Loading

महात्मा फुले जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये समता परिषदेचे अभिवादन

विविध सामाजिक संघटनांचा सहभाग; फुले विचारांचा जागर करत समतेचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) :
थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि शेतकरी-वंचित घटकांचे खंबीर पुरस्कर्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त अमळनेर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या साथीने समाजात शिक्षणाची क्रांती घडवून आणणाऱ्या आणि भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, संत सावता माळी सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या कार्यप्रेरणा स्तंभास पुष्पहार अर्पण करून तसेच पुतळ्याचे पूजन करून कृतज्ञ अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी समता परिषदेचे जिल्हा संघटक भिमराव महाजन, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन सर, युवा कल्याण प्रतिष्ठानचे प्रा. अशोक पवार सर, संविधान जागरच्या प्रमुख श्रद्धा (रेखा) राजेंद्र, ठाकरे सर, माळी समाजाचे सचिव गणेश महाजन सर, माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर, पांडुरंग महाजन, बी.आर. महाजन सर, कुबेर ग्रुपचे महेंद्र महाजन, भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन, ॲड. रमाकांत महाजन, ॲड. कुंदन साळुंखे, कैलास गजानन महाजन, अशोक पोपट महाजन, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष चित्रकला प्रकाश महाजन, प्रा. प्रकाश महाजन, गणेश उखा महाजन, राजेंद्र भास्कर महाजन, प्रगती क्लासेस संचालक संदीप महाजन सर, हेमंत बाबूलाल महाजन सर, जितेंद्र महाजन यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्य व समता सैनिक तसेच ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी फुले-आंबेडकरी विचारांना अनुसरून शिक्षण, समानता आणि बंधुभाव यांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कॅप्शन :
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर “सार्वजनिक सत्यधर्म” ग्रंथ हाती घेत फुलेप्रेमी उत्साहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *