फार्मासी महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी*
1 min read

फार्मासी महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी*

Loading

*फार्मासी महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी*

अमळनेर प्रतिनिधी
​खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी महाविद्यालयात थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
​कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र स. सोनवणे व समन्वयक प्रा.डाॅ.एम.एस.वाघ यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी महाविद्यालयातील प्रा.देवेश भावसार, प्रा.प्रितम पाटील, प्रा.स्वप्नाली, प्रा. छाया महाजन, प्रा. प्रगती पाटील, प्रा.गितांजली पाटील, प्रा. वैशाली कुलकर्णी व कार्यालयीन अधीक्षक श्री.अनिल महाजन, श्री. सुजित अमळकर, श्री. ज्ञानेश्वर चौधरी, श्री. जितेन्द्र पाटील, श्री. शिवाजी पाटील श्री.पंकज पवार, श्री.कैलास कड, श्री. विनय ब्रम्हे, श्री.प्रकाश पाटील, श्री. अतुल पाटील, श्री. प्रशांत चौधरी, श्री. यश शिंपी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदविका व पदवी विभागातील सर्व विद्यार्थी यांचे या निमीत्ताने फार्मसी विभागाचे चेअरमन श्री. योगेश मुंदडे यांनी अभिनंदन करुन खान्देश शिक्षण मंडळाची गुणवत्तेची, सुस्कृंततेची व एकजूटतेची परंपरा यापढे अखंडीतपणे सुरु ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *