दहावीनंतर काय करू? जळगावात नोबेल फाउंडेशनचा महासेमिनार , मुंबई व बेंगलोर येथील तज्ञांचे मार्गदर्शन; करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
![]()
दहावीनंतर काय करू? जळगावात नोबेल फाउंडेशनचा महासेमिनार
मुंबई व बेंगलोर येथील तज्ञांचे मार्गदर्शन; करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
जंळगाव प्रतिनिधी:
नुकतीच अकरावी प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीनंतर करिअर कसे निवडावे आणि घडवावे याबद्दल संभ्रम असतो.यासाठी जळगाव येथील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे दहावीनंतर काय करू या महा सेमिनारचे आयोजन १४ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वा करण्यात आलेले आहे. सदर सेमिनार नोबेल फाउंडेशन सभागृह विद्युत कॉलनी दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ हायवे लगत नायरा पेट्रोल पंपाच्या मागे संपन्न होणार आहे.
या अंतर्गत करिअर निवडण्याची शासकीय पद्धत डीएमआयटी मार्गदर्शन केले जाणार आहे. आयआयटी प्रवेश परीक्षा तसेच मेडिकल प्रवेश परीक्षेबाबत देखील मार्गदर्शन केले जाणार आहे .याप्रसंगी मुंबई येथील प्रसिद्ध करिअर तज्ञ ओमकार करिअर अकॅडमी चे संचालक, महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षेत राज्यात दोन वेळा प्रथम आलेले प्रसिद्ध लेखक संतोष पवार आणि बेंगलोर येथील लाईफ टूल्स चे संचालक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्गदर्शक हिमांशू शुक्ला उपस्थित राहणार आहेत. कधी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या महासमेनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील सर यांनी केलेले आहे. माहिती आणि नाव नोंदणीसाठी 9922004193 या क्रमांकावर संपर्क साधावा.

