सावित्रीबाई फुले विद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन; शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन; शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
अमळनेर प्रतिनिधी:
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य पी. एम. कोळी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर ज्युनियर विभाग प्रमुख एस. एस. साळुंखे, एस. एस. पाटील तसेच अनिल पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी ज्युनियर विभागातील नितीन पाटील, आर. आर. पाटील, किरण पाटील, कल्याण नेरकर तसेच माध्यमिक विभागातील विजेंद्र गवळे, सुनील वाघ, दीपक पाटील, गौरव पाटील, हर्षल बेहरे, नीलिमा पाटील, रूपाली पाटील आदी शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रामराव पाटील व सतीश बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ हडपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समाधान पाटील यांनी मानले.

