अमळनेर तालुका होमिओपॅथिक संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. दिपाली साळुंखे यांची निवड
![]()
अमळनेर तालुका होमिओपॅथिक संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. दिपाली साळुंखे यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) :
अमळनेर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्या (HIMPAN) तालुका अध्यक्षपदी डॉ. दिपाली कुंदन साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड १० एप्रिल २०२६ रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त मंगळ ग्रह देव संस्थान, अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हॅनेमन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. दिपाली साळुंखे यांनी तालुका अध्यक्ष पदाची सूत्रे औपचारिकरीत्या स्वीकारली. यावेळी संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, तसेच तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. साळुंखे यांच्या निवडीमुळे तालुक्यातील होमिओपॅथिक क्षेत्राला सक्षम नेतृत्व मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्यातून संघटना अधिक बळकट होऊन रुग्णसेवा अधिक प्रभावी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

