महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; देवगावच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन
![]()
महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; देवगावच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले हायस्कूल, देवगाव येथे शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी गडखांब केंद्राचे विशेष शिक्षक प्रशांत पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा व समाजप्रबोधनातील योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला. शिक्षण, स्त्रीशिक्षण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी शाळेचे शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण श्रद्धा, कृतज्ञता आणि प्रेरणादायी विचारांनी भारावलेले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे सांस्कृतिक विभागप्रमुख आय. आर. महाजन यांनी विशेष शिक्षक प्रशांत पाटील यांचे शाळेत स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

