अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी अँड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी अँड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार (पॅनल अँडव्होकेट) पदावर अभ्यासू व कर्तृत्ववान विधीज्ञ अॅड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. अँड. साळुंखे हे अमळनेर तसेच जिल्हा न्यायालयात सक्रियपणे वकिली व्यवसाय करत असून, त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये प्रभावी युक्तिवाद सादर केला आहे. यापूर्वीही त्यांची अर्बन बँकेचे कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती झालेली असल्याने त्यांच्या अनुभवाचा नगरपरिषदेला मोठा फायदा होणार आहे. नगरपरिषदेच्या वतीने दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये तसेच जिल्हा सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयांमध्ये ते नगरपरिषदेची बाजू प्रभावीपणे मांडणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे नगरपरिषदेच्या कायदेशीर कामकाजाला अधिक गती व सक्षम दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अॅड. कुंदन साळुंखे यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष नानासाहेब गंभीर सर (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात), मनोहर महाजन सर (अध्यक्ष, अमळनेर माळी समाज), पांडुरंग महाजन (माजी उपनगराध्यक्ष), प्रशांत निकम (उपनगराध्यक्ष), तसेच भीमराव महाजन सर (संपादक, माळी भूषण) यांचा समावेश आहे. तसेच पप्पू महाजन, बापूसाहेब रणजीत पाटील, हेमंत दादा भांडारकर, अँड. आर. जी. चव्हाण, बापू चिमण महाजन, डॉ. योगेश रघुनाथ महाजन, बाबूलाल महाजन सर, गंगाराम निंबा महाजन, नरेश साळी, शंकर सोमा महाजन, गोविंदा दगा महाजन, आर. एन. पवार सर, राहुल महाजन, अनिल मधुकर महाजन, राजेंद्र भास्कर महाजन यांच्यासह नातेवाईक, मित्रमंडळी, अमळनेर वकील संघ, कोर्ट कर्मचारी संघटना, नगरपरिषदेचे कर्मचारी वर्ग व लासूर गावचे ग्रामस्थ यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय डॉ. अविनाश जोशी, दिगंबर महादेव सर (अध्यक्ष, मंगळ ग्रह देव संस्थान, अमळनेर), जितेंद्र सुरेश महाजन (अध्यक्ष, माळी समाज नवयुवक मंडळ, महाराष्ट्र राज्य), बी. जी. नाईक साहेब, डॉ. रामभाऊ दादा शेलकर, डॉ. विलास महाजन, जितेंद्र बडगुजर तसेच अजय दादा पाटील (राणा) यांनीही अँड. साळुंखे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

