अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सारांश सोनार , मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; अभ्यासू वकिलाची निवड
1 min read

अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सारांश सोनार , मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; अभ्यासू वकिलाची निवड

Loading

अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सारांश सोनार

 

मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; अभ्यासू वकिलाची निवड

​अमळनेर (प्रतिनिधी):
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून तरुण व अभ्यासू विधीज्ञ ॲड. सारांश सोनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले.
​ॲड. सारांश सोनार हे सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि अमळनेर येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत आहेत. यापूर्वी त्यांची नियुक्ती अर्बन बँकेचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही झालेली आहे. नगरपरिषदेच्या वतीने दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये, तसेच जिल्हा सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयातील प्रकरणांमध्ये ते परिषदेची बाजू मांडतील.
​या नियुक्तीबद्दल त्यांचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. माजी आमदार शिरीषदादा चौधरी, डॉ. डीगंबर महाले, अँड एस आर पाटील, ॲड. रमाकांत माळी, डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, डॉ. अविनाश जोशी, आणि काँग्रेस नेते संदीप घोरपडे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *