ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे सन्मानित
1 min read

ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे सन्मानित

Loading

ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे सन्मानित

उरुळी कांचन: येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. समाजामध्ये समर्पित भावनेने वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स हे रुग्णसेवा करीत असतात. सामाजिक जाणिवेची भान ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथे डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन सदस्य डॉक्टरांना ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे ह्यांचा स्मृतीचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गणेश ननावरे, पुनम मॅडम, अस्मिता मॅडम, डॉक्टर मयूर लिंभोरे, डॉक्टर हिंदवी मयूर लिंभोरे, व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *