शिक्षक शिक्षकेतरांना मार्च पेड इन एप्रिल चे वेतन मिळणार- अनिल बोरनारे*  *शिक्षक महासंघ संघटनेच्या पाठपुराव्याला यश*
1 min read

शिक्षक शिक्षकेतरांना मार्च पेड इन एप्रिल चे वेतन मिळणार- अनिल बोरनारे* *शिक्षक महासंघ संघटनेच्या पाठपुराव्याला यश*

Loading

*शिक्षक शिक्षकेतरांना मार्च पेड इन एप्रिल चे वेतन मिळणार- अनिल बोरनारे*

*शिक्षक महासंघ संघटनेच्या पाठपुराव्याला यश*

मुंबई (प्रतिनिधी)
शासनाकडून वेतनासाठी निधी उपलब्ध नसल्याने राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांचा मार्च पेड इन एप्रिलच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता अखेर नवीन आथिर्क वर्षांत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला निधी वितरणासाठी मंजुरी मिळाली असून दोन चार दिवसात शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.

याबाबत अनिल बोरनारे यांनी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.
वेतनासाठी निधीच उपलब्ध नसल्याने शिक्षकांचे वेतन होते की नाही अशी शंका निर्माण झाली होती त्यातच शिक्षकांचे विविध प्रकारचे हप्ते पगारातून जात असतात यामध्ये गृह कर्ज विम्याचा हप्ता व इतर वजावट असते हे सगळे वेळेवर न गेल्यामुळे संबंधित कंपन्या शिक्षकांकडून दंड आकारत असतात त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरांना नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागतो. शिक्षण निरीक्षक कार्यालयाने बिल मंजुरी करून ट्रेझरीकडे बिल सादर केल्यानंतर दोन दिवसात पगार होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *