आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर आणि जयनिल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा
1 min read

आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर आणि जयनिल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा

Loading

आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर आणि जयनिल फाऊंडेशनतर्फे
स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा

अमळनेर प्रतिनिधी:-देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवत आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात व अभिमानाने संपन्न झाला.
माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगाव-देवळी, अमळनेर येथील आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. बेस कॅम्प येथे सकाळी ८:०० वाजता राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.यावेळी श्रीमती पुष्पाबाई भाईदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री अनिल पाटील,हिंगोणे येथील लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील,जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील,उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यासह जयनिल चे सदस्य आणि आर बी इन्फ्रास्ट्रक्चरचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेल्या या अमूल्य स्वातंत्र्याची जपणूक करत राष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *